कणकवली : वारस तपास, खरेदीखत , सात बारा, फेरफार यांच्या नोंदी विलंबाने होत असल्याने जनतेची गैरसोय होत आहे. याबरोबरच महसुल विभागांतर्गत अन्य समस्या तत्काळ सोडवाव्यात अशी मागणी करीत काँग्रेसच्यावतीने सोमवारी येथील तहसील कार्यालयात आंदोलन करण्यात आले. तसेच जोपर्यत्न ऑफ़लाईन सातबारा देण्याचे आश्वासनन आपल्याला मिळत नाही तोपर्यन्त येथून हलणार नाही. असा पवित्राही घेण्यात आला. त्यामुळे काहीवेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.> दरम्यान, प्रभारी तहसीलदार एस.जी. जाधव यांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केल्यानंतर ऑनलाईन सातबारा तसेच अन्य कारणांमुळे सामान्य जनतेला त्रास होणार नाही याबाबत आम्ही काळजी घेवू असे आश्वासन दिल्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन देवून काँग्रेसचे हे आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताड़े, जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे, पंचायत समिती सभापती भाग्यलक्ष्मी साटम, उपसभापती दिलीप तळेकर, जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार, स्वरूपा विखाळे, पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, प्रकाश पारकर, हर्षदा वाळके, वागदे सरपंच संदीप सावंत, हेमंत परुळेकर,दत्ता काटे, सुशिल सावंत, सोनू सावंत,आनंद ठाकुर, नगरसेवक अभिजीत मुसळे, कीशोर राणे, सुविधा साटम आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.> ऑनलाइन सातबारा तसेच इतर समस्याबाबत काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे पत्र तहसील कार्यालयाला देण्यात आले होते. त्यामुळे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या नेतृत्वाखाली कड़क पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.> काँग्रेसचे शिष्टमंडळ ज्यावेळी तहसील कार्यालयात पोहचले त्यावेळी तहसिलदारांच्या दालनात रोजगार हमी योजनेची आढावा बैठक सुरु होती. त्यामुळे आगावू कल्पना देवूनही तहसिलदारानी ही बैठक मुद्दाम ठेवल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यानी केला. तसेच जोपर्यन्त दालनात प्रवेश मिळत नाही तोपर्यन्त दरवाजा समोरच बसणार असल्याचे सांगत तिथेच ठिय्या मारला.> निवासी नायब तहसीलदार भारतभूषण रजपूत यांनी कॉंग्रेस पदधिकाऱ्यांशी संवाद साधत पाच मिनिटांत बैठक संपल्यानंतर आपण चर्चा करु असे सांगितले. मात्र, तोपर्यन्त आम्ही इथेच बसतो असे सांगत काँग्रेस कार्यकर्ते तिथेच बसून राहिले. थोड्यावेळाने बैठक संपल्यावर त्यांना दालनात प्रवेश देण्यात आला.> यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यानी तसेच कार्यकर्त्यांनी तहसिलदारांसमोर विविध समस्या मांडल्या. > शेतकऱ्यांना वेळेत सातबारा उतारे मिळत नाहीत. एखाद्या मिळकतीचा मृत्यु पश्चात अगर अन्य कारणाने फेरफार दाखल करायचा झाल्यास तो वेळेत दाखल केला जात नाही. याबाबत ऑनलाईन हे कारण तलाठी सांगतात. सध्या मार्च अखेर असून कर्जाच्या कामासाठी शेतकऱ्यांना सात बारा तातडीने मिळणे आवश्यक आहे. मात्र, तो मिळत नाही. शेतकरी आपल्या मिळकती मध्ये फेरफार दाखल करतो त्यावेळी त्याला पोच दिली जात नाही. ती देण्यात यावी. सातबाराच्या ऑनलाईन कामासाठी तलाठी तहसील कार्यालयात उपस्थित रहात असल्याने गावात जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी घर बांधणी परवानगीचे अधिकार ग्रामपंचायतीला होते. मात्र, आता ते अधिकार महसुल खात्याकडे वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे सामान्य जनतेला घरबांधणीसाठी कागदपत्रांची पूर्तता करणे अवघड झाले आहे. त्यामुळे शासनाचा हा निर्णय बदलण्यात यावा. अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.(प्रतिनिधी)अन्यथा पुन्हा आंदोलन !येत्या आठ दिवसात ऑनलाईन सातबाराबाबत प्रशासनाने ठोस निर्णय न दिल्यास पुन्हा तहसील कार्यालयात काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुरेश सावंत यांनी यावे
कणकवली तहसील कार्यालयात काँग्रेसचे आंदोलन
By admin | Published: March 20, 2017 5:52 PM