ओरोस : जिल्हा परिषद इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर अपंग व्यक्तींना जिल्हा परिषदेत प्रवेश करण्यासाठी रॅम्प बांधण्याचे काम सुरू केले होते. मात्र, लॉकडाऊनच्या काळात हे काम अर्धवट टाकल्याने प्रवेशद्वारासमोर ठेवण्यात आलेली सिमेंटची पोती खराब झाली आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचा हजारो रुपयांचा निधी पाण्यात वाहून गेला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा, सभापती, पदाधिकारी तेथून रोज जात असूनही याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.जिल्हा परिषदेच्या मुख्य दरवाजावर अपंग बांधवांना आत प्रवेश करण्यासाठी नव्याने रॅम्प बनविण्याचे काम सुरू होते. मात्र, कोरोना साथीमुळे लॉकडाऊन झाल्याने हे काम अर्धवट स्थितीत टाकण्यात आले. त्यामुळे यासाठी वापरण्यात येणारी रेती, सिमेंट, खडी, फरशी हे सर्व सामान पावसात भिजत पडले असून याकडे प्रशासनाने पूर्णत: दुर्लक्ष केले आहे.यामुळे जिल्हा परिषदेचे हजारो रुपये पाण्यात गेल्याचे पहावयास मिळत आहेत. सिमेंटची पोती पाण्यात भिजत पडलेली आहेत. या प्रवेशद्वारावरून सर्वच अधिकारी, पदाधिकारी दररोज ये-जा करतात. मात्र, याबाबत कोणीही बांधकाम विभागाला किंवा जिल्हा प्रशासनाला जाब विचारलेला नाही. बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या बाजूलाच हे सामान पडले आहे. हेच काम जर एखाद्या अधिकाऱ्याच्या किंवा कर्मचाऱ्याच्या घरात सुरू असते तर त्याकडे तत्काळ लक्ष देऊन ते पूर्ण केले असते. मात्र, शासकीय काम असल्याने या कामाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे.पालकमंत्री, प्रशासनाची होती परवानगीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरू असलेली शासकीय बांधकामे सुरू ठेवण्याच्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या होत्या. तसेच प्रशासनाने पूर्वपरवानगी दिली होती. प्राधिकरण क्षेत्रातील अनेक रस्ते व पदपथ तयार करण्याची कामे भरपावसातही सुरू आहेत.शासकीय कामाकडे दुर्लक्षजिल्हा परिषद मुख्य प्रवेशद्वारावर अपंग बांधवांना वर चढून आत येण्यासाठी रॅम्पचे काम सुरू होते. ते सध्या बंद पडलेले दिसत आहे.याकडे जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी जनतेतून मागणी होत आहे. शासकीय काम असल्याने दुर्लक्ष केला जात असल्याचाही आरोप केला जात आहे.
बांधकामाचे साहित्य पावसात भिजल्याने झाले खराब, निधी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 3:35 PM
जिल्हा परिषद इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर अपंग व्यक्तींना जिल्हा परिषदेत प्रवेश करण्यासाठी रॅम्प बांधण्याचे काम सुरू केले होते. मात्र, लॉकडाऊनच्या काळात हे काम अर्धवट टाकल्याने प्रवेशद्वारासमोर ठेवण्यात आलेली सिमेंटची पोती खराब झाली आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचा हजारो रुपयांचा निधी पाण्यात वाहून गेला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा, सभापती, पदाधिकारी तेथून रोज जात असूनही याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
ठळक मुद्देबांधकामाचे साहित्य पावसात भिजल्याने झाले खराब, निधी वाया सर्वांचेच दुर्लक्ष : रॅम्प बांधण्याचे काम अपूर्णच