शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
3
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
4
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
5
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
6
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
7
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
8
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
9
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
10
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
11
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
12
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
13
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
14
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."
15
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
16
कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC
17
सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अ‍ॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
18
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
19
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
20
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

बांधकाम अधिकाऱ्यांना धरले धारेवर

By admin | Published: October 18, 2016 11:45 PM

दोडामार्ग तालुक्यात रस्त्यांची दयनीय अवस्था : शिवसेना-भाजपचे पदाधिकारी आक्रमक

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यांतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची वस्तुस्थिती नाकारणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलेच फैलावर घेतले.‘तुमच्यासारख्या नाकर्त्या आधिकाऱ्यांमुळेच सरकारची बदनामी होत असल्याचा आरोप भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांनी केला. येत्या सोमवारपर्यंत रस्त्यावर पडलेले सर्व खड्डे न बुजविल्यास कार्यालयातच ठाण मांडून बसू, असा इशारा सनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी दिला.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मात्र, ते बुजविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याने त्याचा फटका सर्वसामान्य वाहनचालकांना बसतो आहे. खतीब यांच्या पत्राबाबत याबाबतची माहिती सेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांना समजताच त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात धडक दिली. यावेळी बाबा खतीब, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर, सेनेचे तालुकाप्रमुख धुरी, भगवान गवस, खुशाली शेटकर, प्रवीण गवस आदींनी शाखा अभियंता अशोक बेहरे यांना धारेवर धरत याबाबत जाब विचारला. तसेच अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाबाबत चांगलेच खडे बोल सुनावले. येत्या सोमवारपर्यंत जर खड्डे बुजविले नाहीत, तर कार्यालयातच ठाण मांडून बसू, असा इशारा यावेळी म्हापसेकर व धुरी यांनी दिला. (प्रतिनिधी)वस्तुस्थिती नाकारण्याचा प्रयत्नदोडामार्ग-तिलारी रस्त्यावर झरेबांबर विमानतळ येथे रस्ता उखडण्यात आला आहे. त्याला अनेक महिने झाले, तरी तो पूर्ववत करण्यात न आल्याने अपघात होऊन अनेकजण जखमी झाले. पण तरीदेखील खड्डा बुजविण्याची बुध्दी बांधकामच्या अधिकाऱ्यांना झाली नाही. त्यामुळे साटेली भेडशी येथील बाबा खतीब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच थेट पत्र पाठवून तक्रार केली होती. याबातचे वृत्त स्थानिक वृत्तपत्रांमध्ये आले. मात्र, खतीब हे दिशाभूल करीत असून, दोडामार्ग-तिलारी रस्त्यावर एकही खड्डा नाही. शिवाय तालुक्यातही अशी परिस्थिती नाही, असे सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी सांगून वस्तुस्थिती नाकारण्याचा प्रयत्न केला.