शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
3
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
4
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
5
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
6
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
7
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
8
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती
9
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
10
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
11
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
12
"मी राजकारणात आलेलं चाहत्यांना आवडलेलं नाही, पण...", राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सयाजी शिंदे पहिल्यांदाच बोलले
13
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
14
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
15
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
16
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
17
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
18
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
19
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
20
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी

उद्योगधंद्यांच्या ‘हब’ची होणार निर्मिती : राजापूर होईल महानगरी--रिफायनरी एक सुवर्णसंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 11:34 PM

हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील रिफायनरी प्रकल्प अभ्यासदौऱ्याअंतर्गत पहिल्या भागात आपण रिफायनरीअंतर्गत पेट्रोलियम पदार्थनिर्मिती आणि त्याचा उपयोग याची माहिती घेतली. या भागात पेट्रोकेमिकल्स निर्मितीअंतर्गत पेट्रोलियम पदार्थांचा वापर याची माहिती घेणार आहोत. हे पदार्थ उद्योगधंद्यांसाठी

ठळक मुद्देघरबसल्या मिळेल रोजगार- कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमात भाग घेणे आवश्यक

महेश सरनाईक ।सिंधुदुर्ग : हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील रिफायनरी प्रकल्प अभ्यासदौऱ्याअंतर्गत पहिल्या भागात आपण रिफायनरीअंतर्गत पेट्रोलियम पदार्थनिर्मिती आणि त्याचा उपयोग याची माहिती घेतली. या भागात पेट्रोकेमिकल्स निर्मितीअंतर्गत पेट्रोलियम पदार्थांचा वापर याची माहिती घेणार आहोत. हे पदार्थ उद्योगधंद्यांसाठी कच्चा माल म्हणून वापरले जातात. याचा वापर करून विविध साहित्य तयार केले जाते. यात विमानाच्या पार्टपासून अगदी प्लास्टिक पिशव्यांपर्यंतचा समावेश होतो.

रिफायनरी प्रकल्पाअंतर्गत पेट्रोकेमिकल्स पदार्थांच्या निर्मितीनंतर यातील ४५ टक्के आयात कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हरियाणा राज्यातील पानिपत रिफायनरीमध्ये पेट्रोकेमिकल्स पदार्थांच्या कितीतरी पटीने जास्त उत्पादन राजापूर रिफायनरी प्रकल्पामध्ये होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पातून उद्योगधंद्यांचा हब निर्माण होणार असून यातून अनेक नवनवीन उद्योग निर्माण होतील.

नाणार येथील रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल प्रकल्प १६ हजार एकर परिसरात होणार आहे. यात ३0 ते ३५ टक्के जमीन असून ३४ हजार एकरावर ग्रीन बेल्ट (वनसंपत्ती) आहे. प्रकल्पबाधीत क्षेत्रात कलमांची आणि रोपांची लागवड करण्यात येणार आहे. ३0 टक्के जमिनीवर झाडे लावल्याशिवाय सरकार किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळ या प्रकल्पाला मंजुरीच देऊ शकत नाही. तशी तरतूद करारनाम्यात करण्यात आली आहे.

आता प्रकल्प होत असलेल्या या प्रकल्पाअंतर्गत घेण्यात येणाºया जमिनीतील ७३ टक्के जमीन ओसाड आहे. यात पाळेकरवाडी आणि चौके ही दोन गावे पूर्णपणे प्रकल्पबाधित आहेत. तर अन्य १२ गावे हे निम्मी बाहेर आणि निम्मी आत आहेत. तर प्रकल्पाला लागून दोन गावे ही इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये येतात. त्यात कुंभवडे व वाडापालये यांचा समावेश आहे. आता या प्रकल्पात राजापूर तालुक्यातील १४ गावे आणि सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील दोन गावे ही प्रकल्पबाधित असल्याने या पूर्ण भागात शहरीकरण वाढेल.कोकणात होईल घरवापसीसिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या कंपन्या सोडल्या तर कोणतेही मोठे उद्योगधंदे नाहीत. परिणामी येथील घराघरातील सुशिक्षित व्यवसाय, उद्योगासाठी किंवा नोकरीसाठी पुणे, मुंंबई, कोल्हापूर, गोवा महानगरांची वाट धरतात. त्यामुळे कोकणातून मोठ्या प्रमाणावर लोकांचे दरवर्षी स्थलांतर होत असते. नाणार येथील रिफायनरी सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे व्यवसाय निर्माण होणार आहेत. त्यामुळे आता व्यवसायासाठी, नोकरी धंद्यासाठी वणवण भटकणाºया सर्वांची या निमित्ताने कोकणात कायमस्वरूपी ‘घरवापसी’ होण्यास मदत होणार आहे.आंबा, काजू, मच्छिमारीसाठी मोठी बाजारपेठ !रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून नाणार येथे मोठ्या बाजारपेठा निर्माण होतील. मच्छिमार, आंबा बागायतदारांसाठी मोठी बाजारपेठ निर्माण होईल. सध्या या भागात मोठ्या बाजारपेठा नसल्यामुळे उत्पादन खर्च प्रचंड वाढत आहे. वाहतूक खर्चामुळे उत्पादन बाजारपेठेत नेईपर्यंत त्याचा दर गगनाला भिडणारा होत आहे. परिणामी ज्यावेळी येथील आंबा, काजू, नारळ व इतर पिकांना या भागातच मोठी बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे वाहतूक खर्च पूर्णपणे वाचेल आणि परिणामी नफ्यातही वाढ होईल.(पुढील भागात रिफायनरीतून प्रदूषण यात तारतम्यच नाही)

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकण