शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

वीज कंपनीला ग्राहक मंचाच्या दणका

By admin | Published: March 07, 2017 5:44 PM

वाडोस येथील राणे यांचा वीजपुरवठा खंडीत प्रकरण : १0 हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश

वीज कंपनीला ग्राहक मंचाच्या दणका

वाडोस येथील राणे यांचा वीजपुरवठा खंडीत प्रकरण : १0 हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश

सिंधुदुर्गनगरी : अवाजवी विद्युत बिल देत ते न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याची नोटिस कुडाळ तालुक्यातील वाडोस येथील वसंत देऊ राणे यांना बजावणाऱ्या महावितरण कंपनीला सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक मंचाने दणका दिला आहे. राणे यांना बजावण्यात आलेली नोटिस रद्द करत त्यांना वीज देयक दुरुस्त करून देण्यासह त्यांना झालेल्या खर्चापोटी व नुकसानभरपाई म्हणून १0 हजार रुपये देण्याचे आदेशही महावितरण कंपनी कुडाळ विभाग यांना दिले आहेत. वसंत देऊ राणे यांनी डिसेंबर २0११ मध्ये वीज कनेक्शन घेवून वाडोस येथे पीठ व भात गिरण सुरु केली होती. राणे विद्युत मिटरच्या वापराप्रमाणे नियमितपणे विजबील भरणा करीत होते. जानेवारी २0१५ मध्ये त्यांच्या वीज मिटरचा डिस्प्ले गेला. याबाबत त्यांनी विद्युत वितरण कंपनीकडे लेखी अर्ज देवून कल्पना दिली होती. मात्र विद्युत कंपनीने जुलै २0१५ पर्यंत त्यांचा विद्युत मीटर बदलून दिला नाही. मात्र राणे यांना अचानकपणे जुलै २0१५ मध्ये ७0 हजार २९0 रुपयांचे अवास्तव विजबिल देण्यात आले. या बिलात जानेवारी २0१५ ते जुलै २0१५ या कालावधीत एकूण १0 हजार ६0५ युनीट वापरले असल्याचे दाखविण्यात आले आहे. परंतू राणे यांनी वीज कनेक्शन घेतल्यापासून देखील एवढा विजेचा वापर केला नव्हता त्यांचे सरासरी मासिक विजबिल ५00 ते २000 रुपये एवढेच येत होते. याबाबत वसंत राणे यांनी हे वीज देयक दुरुस्त करून देण्यासाठी महावितरण कंपनी कुडाळ विभाग यांच्याकडे लेखी अर्ज केला होता मात्र महावितरण कंपनीने त्यांच्या या अर्जाकडे दुर्लक्ष करीत त्यांनाच विजबिल न भरल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्यात येईल अशी नोटिस महावितरणच्या विधी अधिकाऱ्यांमार्फत बजावली होती. सदर प्रकरणी वसंत राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार केली होती. या तक्रारीवर झालेल्या सुनावणित राणे यांची तक्रार ग्राहक मंचाने मान्य केली आहे. तसेच त्यांना महावितरण कंपनीने दिलेले अवास्तव वीज देयक व वीज पुरवठा खंडित करण्याची बजावलेली नोटीस रद्द ठरविली आहे. त्याचप्रमाणे राणे यांना मागील सरासरी वीज वापराप्रमाणे जानेवारी ते जून २0१५ पर्यंत विज देयके दुरुस्त करून देण्यासह त्यांना झालेल्या खर्चापोटी व नुकसान भरपाई म्हणून १0 हजार रुपये देण्याचे आदेश सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक मंचाने महावितरणला दिले आहेत. राणे यांच्यावतीने अ‍ॅड. यतीश खानोलकर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)