ऑनलाइन लोकमत
सिंधुदुर्ग, दि, 9- कोकणातील परंपरागत पद्धतीने करण्यात येणारी शेती कमी होऊन आधुनिक यंत्र सामुग्रीच्या सहाय्याने शेतकरी शेतीची कामे करू लागली आहेत. आधुनिक पद्धतीच्या शेतीमुळे श्रम, पैसा आणि वेळेची बचत होत असल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे.
शिवाय, अनेकदा शेतीची कामे करण्यासाठी मजूर शोधण्याचीही गरज भासत नाही. कासार्डे, तळेरे परिसरात सध्या आधुनिक यंत्राद्वारे शेतीची बरीच कामे केली जात आहेत.
https://www.dailymotion.com/video/x844hby