शहरं
Join us  
Trending Stories
1
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
2
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
3
भुजबळ-जरांगे समर्थक आमने-सामने; महामार्गावरील वाहतूक रोखली, येवल्यात तणाव!
4
Ind vs Aus Women: भारताच्या आशा मावळल्या! ऑस्ट्रेलियाने 9 धावांनी केला पराभव
5
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
6
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
7
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
8
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
9
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
10
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
11
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
12
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
13
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
15
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
16
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
17
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
18
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
19
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
20
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी

सिंधुदुर्गात संततधार सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2016 11:47 PM

बळिराजा सुखावला : गतवर्षीच्या तुलनेत ३0२७ मिलिमीटर जास्त पाऊस

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची असणारी संततधार शनिवारीही सुरूच होती. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज अजूनपर्यंत तरी खरा ठरला आहे. दरम्यान, गेले पाच दिवस सिंधुुदुर्गात पडलेल्या संततधार पावसाने नदी, नाले, ओहोळांना पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चौवीस तासांत जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस कणकवली तालुक्यात पडला आहे. गेल्या महिन्याभरात जिल्ह्यात १२९१.३० च्या सरासरीने १०३२८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, गतवर्षी याच दिवसापर्यंत ९१२.६५ च्या सरासरीने ७३००.२० मिलीमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात यावर्षी ३०२७ मिलीमीटर जास्त पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाकडे प्राप्त आहे. अजूनपर्यंत जिल्ह्यात पडझड होऊन ११ लाख १७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या पावसाने बळिराजा मात्र सुखावला आहे. जिल्ह्यात यावर्षी पावसाने उशिरा जरी सुरुवात केली असली तरी तो समाधानकारक बरसत आहे. यंदा सरासरीपेक्षा १३० टक्के पाऊस जास्त पडणार असे हवामान खात्याचे भाकीत सद्य:स्थितीत तरी सत्यात उतरले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ३०२७ मिलीमीटर जास्त पाऊस पडला असून, शेतीसाठी पूरक असा पाऊस पडत आहे. यामुळे शेतकरी सुखावला असून शेतीच्या कामांना जोर चढला आहे. १९ जूनपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने अद्यापपर्यंत पाचजणांचे बळी घेतले असून त्यापैकी दोन मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी चार लाखांप्रमाणे प्रशासनाकडून मदत केली आहे. पाच जनावरे मृत्युमुखी पडली असून, त्यापैकी एका जनावराच्या मालकाला २५ हजारांची मदत करण्यात आली आहे. (प्रतिनिधी) वरवडेत पुराच्या पाण्याने वाहतूक ठप्प कणकवली तालुक्यात शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. वरवडे सेंट उसुर्ला स्कूलजवळ कणकवली-आचरा रस्त्यावर सकाळी ७ वाजता पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी दोन तास बंद झाला होता. त्यानंतर पाणी ओसरल्याने वाहतूक सुरु झाली. कणकवली-आचरा, कलमठ -फणसवाडी, बिडवाडी, आडवली येथे रात्री रस्त्यावर झाडे उन्मळुन पडली. ही झाडे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता प्रमोद कांबळे यांनी सहकाऱ्यांसहित मध्यरात्री तीन वाजल्यापासून बाजूला केली. तसेच रस्ता वाहतुकीस मोकळा केला. तर वरवड़े सेंट उसुर्ला हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शनिवारी वाढत्या पावसामुळे सुटी देण्यात आली होती ६१ घरांची पडझड गेल्या महिनाभरात जिल्ह्याभरातील ६१ घरांची पडझड होऊन सुमारे नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे., तर सात गोठ्यांची पडझड झाली असून, त्यात ५८ हजार ४४० रुपयांचे नुकसान झाले आहे. शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू देवगड : तालुक्यातील जामसंडे येथील तलावात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेला प्रतीक राजन ठुकरूल (वय १६, रा. जामसंडे बेलवाडी) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली असून, देवगड पोलिस ठाण्यामध्ये या घटनेची आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. वृत्त/४