शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

कडवईत मत्स्य उत्पादन प्रकल्प सुरू

By admin | Published: March 30, 2015 10:34 PM

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. हुकमसिंंग धाकड उपस्थित होते.वापरात नसलेल्या नैसर्गिक जलाशयांचा उपयोग मत्स्य संवर्धनासाठी केला तर राज्याच्या मत्स्योत्पादनात वाढ होऊन

रत्नागिरी : कडवई जलाशयात पिंंजऱ्यातील मत्स्य बोटुकली उत्पादन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राघवेंद्र पै यांचे हस्ते झाले. यावेळी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. हुकमसिंंग धाकड उपस्थित होते.वापरात नसलेल्या नैसर्गिक जलाशयांचा उपयोग मत्स्य संवर्धनासाठी केला तर राज्याच्या मत्स्योत्पादनात वाढ होऊन ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, या उद्देशाने राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, मंत्रालय, मुंबई यांच्या अर्थसाह्याने सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी यांच्यातर्फे जलाशयातील पिंंजरा मत्स्यसंवर्धन आणि व्यवस्थापन प्रकल्प राबवला जात आहे. डॉ. बाळासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कडवई (ता. संगमेश्वर) येथे बेरोजगार युवकांचा स्वयं सहाय्यता बचत गट स्थापन करून प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. राज्यातील हा दुसरा प्रकल्प आहे. प्रकल्पप्रमुख डॉ. बाळासाहेब चव्हाण यांनी प्रस्ताविकामध्ये प्रकल्पांतर्गत स्थापन केलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील थेरवडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वयं सहाय्यता बचत गटाने गावाजवळील पळसवाडा तलावामध्ये शास्त्रीय पध्दतीने पिंंजऱ्यातील मत्स्य संवर्धनाला सुरूवात केल्याचे सांगितले. यावेळी विभागप्रमुख डॉ. सुधाकर इंदुलकर, अहमदनगर जिल्ह्यातील थेरवडी येथील बबन थोरात उपस्थित होते.(प्रतिनिधी)