सावंतवाडी : येथील पालिकेत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी पुन्हा एकदा काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आठवडाभरात पगार देण्याचे आश्वासन देऊन सुद्धा पगार न मिळाल्याने आपण पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जोपर्यंत पगार दिला जात नाही तोपर्यंत आम्ही कामावर रुजू होणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे पालिका प्रशासन ठेकेदार आणि कामगार यांच्यात वाद रंगण्याची शक्यता या निमित्ताने निर्माण झाला आहे.या नगरपरिषद कत्राटी कर्मचाऱ्यांनी आठवडाभर पूर्वी पालिका कार्यालयासमोर काम बंद आंदोलन केले होते. यावेळी सर्वपक्षीयांकडून मध्यस्थी करण्यात आली होती. त्यानंतर पगार देण्याचे लेखी आश्वासन ठेकेदारांने दिले होते. त्यानुसार तुम्हाला तुमचा पगार मिळवून देऊ, असे आश्वासन यावेळी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी दिले होते. परंतु दिलेल्या आश्वासनानुसार या ठेकेदाराने त्यांचे मानधन अदा केलेले नाही तर दुसरीकडे फक्त १५ दिवसाचा पगार देतो असे नव्या ठेकेदाराचे म्हणणे आहे. मात्र चतुर्थी जवळ आल्यामुळे अर्ध्या पगारात करायचे काय तसेच दोन महिन्याच्या पगार मिळणार कसा असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळे त्यांनी आज पुन्हा एकदा काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पालिका प्रशासन व ठेकेदार कोणती भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.दोन वर्षापासून पी.एफ ची रक्कम भरलीच नाहीठेकेदाराकडून दोन वर्षापासून कामगारांची पी.एफ ची रक्कम भरली नाही.असे असतना नगरपरिषद अधिकाऱ्यांनी त्यांना कोणतेच बंधन घातले नाही.किंवा विचारणा केली नाही यामुळे ठेकेदारावर कारवाई करतानाच नगरपरिषद मधील दोषींवर कारवाई करा अशी मागणी कामगारांकडून होत आहे.
सावंतवाडी पालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पुन्हा काम बंद आंदोलन
By अनंत खं.जाधव | Published: August 22, 2023 7:05 PM