देवरूख : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा, देवरूखतर्फे २४ जानेवारी २०१६ रोजी माटे - भोजने सभागृहात एकदिवसीय कोकण विभागीय युवा साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.कोकण संस्कृतीचे प्रतिबिंब कथा, कविता कादंबरी या माध्यमातून युवा लेखक, कवी वाचकांपर्यंत पोहोचवत असतात. या नवोदित कवी व लेखकांना मार्गदर्शन मिळावे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक युवा संमेलनात हजेरी लावणार आहेत.कोकणसाठी स्वतंत्र व्यासपीठ म्हणून पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली. या गोष्टीला आता पंचवीस वर्षेे पूर्ण झाली आहेत. देवरुख येथे कोकण विभागीय युवा साहित्य संमेलन होणार आहे. यासाठी सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर, डॉ. महेश केळुसकर, अरुण म्हात्रे, प्रा. एल. बी. पाटील, युवा शक्तीप्रमुख प्रशांत परांजपे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य आणि केंद्रीय समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.एक दिवसीय युवा साहित्य संमेलनात २३ रोजी शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. २४ रोजी सकाळी उद्घाटन, परिसंवाद, चर्चासत्र, कथाकथन, कवी संमेलन, काव्यकट्टा असे कार्यक्रम होणार आहेत. संमेलनानिमित्ताने काव्य स्पर्धा होणार आहेत. (प्रतिनिधी)
कोकण विभागीय युवा साहित्य संमेलन
By admin | Published: January 03, 2016 11:48 PM