कुडाळ : कोविडवर प्रभावी औषध म्हणून ह्यमिथिलीन ब्ल्यूह्णचा उपयोग झाल्यास प्राणवायू आणि व्हेंटिलेटरची गरज लागणार नाही. असा विश्वास रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर मालवणचे डॉ. विवेक रेडकर यांनी व्यक्त केला. सरकारने या औषधाची मात्रा रुग्णांवर देण्यासाठी मान्यता द्यावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरतर्फे सकारात्मक संशोधन करून वैद्यकीय क्षेत्रात निलक्रांती करण्याचे प्रयत्न डॉ. विवेक रेडकर करीत आहेत. कुडाळ एमआयडीसी विश्रामगृहात डॉ. रेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी संस्थेचे विश्वस्त रविकिरण तोरसकर, डॉ. विद्याधर तायशेटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. रेडकर म्हणाले की, सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर देशात कोविड रुग्णांची होणारी वाढ काळजी करणारी आहे. रुग्ण रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी ऑक्सिजन व व्हेंटिलेटरचा शोध घेतो. या मिथीलीन ब्ल्यू औषधामुळे रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासणार नाही असे संशोधनाअंती समोर आले आहे. हे औषध सुमारे १४२ वर्षांपासून सुरू दिले जात आहे. मालवण कोविड केंद्रात औषधाच्या मात्रा देऊन संशोधनामध्ये प्राधान्य दिले आहे.डॉ. विवेक रेडकर म्हणाले, मालवण कोविड केंद्रावर दर आठवड्याला सरासरी सतरा रुग्ण दाखल होतात. गेल्या तीन आठवड्यात आम्ही दाखल झालेल्या सर्व रूग्णांवर मिथीलीन ब्ल्यू अर्थात एम बी औषध देऊन बघितले तेथे रोज तीन ते पाच रुग्ण व्हेंटिलेटरवर, ऑक्सिजनवर ॲडमिट असतात. १० रुग्ण ऑक्सिजन वर असतात, हे सगळे ८८ टक्के पेक्षा कमी ऑक्सिजन मात्र असलेले रूग्ण असतात नॉर्मल किंवा व्हीआयपी कारण नसताना रेमडेसिविर मागणारे असतात.गेल्या तीन आठवड्यात एमबी औषध दिलेला एकही रुग्ण दगावला नाही. शिवाय ऑक्सिजन सिलिंडर दिवसाला पंधरा ते अठरा लागत होते ते आता या औषधामुळे आठ लागत आहे. ऑक्सिजन कमी झाल्यावर लगेच ॲडमिट झाला तर हे औषध जास्त परिणामकारक ठरते.मिथीलीन ब्ल्यू हे १४२ वर्ष जुने औषध आहे. जगात एकही रुग्णाला या औषधाची रिॲक्शन येऊन दगावलेला नाही. किडणीचे विकार, डायलेसिस, गरोदर माता व मातेच्या दुधावर असलेल्या मुलांना ते देऊ नये असे त्यांनी सांगितले. मात्र हे औषध एक वर्ष मुलापासून शंभर वर्ष वयस्कर लोकापर्यंत देऊ शकतो असे डॉ. विवेक रेडकर यांनी स्पष्ट केले.म्युकरमायकोसिसवरदेखील प्रभावी ठरेलशासकीय कोविड केंद्रात औषध वापरण्याची परवानगी लागेल त्यासाठी सरकारने मान्यता द्यायला हवी असे ते म्हणाले. तसेच जागतिक आरोग्य संघटना किंवा सरकारने मान्यता दिली तर रुग्णांना हे औषध प्राणवायू शिवाय उपचार ठरेल. कोविड होऊ नये म्हणून फायदेशीर ठरणारे औषध कोविड रुग्ण, लहान मुलांना देखील उपचारासाठी उपयोगी आहे.
एक वर्षाच्या मुला पासून वयस्कर लोकांना उपयुक्त आहे. मात्र किडणी आजार, डायलेसिस, गरोदर माता व मातेच्या दुधावर असलेल्या मुलांना ते देऊ नये. हिमोग्लोबीन, फुफ्फुसे, शरीरासह अन्य घटकांना औषध उपयुक्त आहे. म्युकरमायकोसिस या जीवघेण्या आजारावर देखील त्याचा शास्त्रीय पद्धतीने वापर केला तर उपयोग ठरू शकतो, असे रेडकर यांनी सांगितले.