कणकवली : कणकवली तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कणकवली बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त चालू असलेली विविध दुकाने कणकवली पोलीस प्रशासन तसेच नगरपंचायतकडून आज बंद करण्यात आली.दरम्यान, कणकवलीचे पोलीस निरीक्षक अजमुद्दिन मुल्ला यांनी चौथ्या चरणातील प्राप्त सूचनानुसार कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेल्या नियमांनुसार अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त जी दुकाने चालू होती ती बंद करण्यात येत आहेत. अशी माहीती त्यांनी दिली.
कारवाई बाजरपेठेत फेरफटका मारत पोलीस निरीक्षक अजमुद्दिन मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सूरज पाटील, सहायक उपफौजदार विनायक चव्हाण, पोलिस हवालदार जाधव, वाहतूक पोलीस माने, न. पं. कर्मचारी रविंद्र महाड़ेश्वर, संतोष माने आदींनी केली.