कुडाळ : कोकणात येणाऱ्या रेल्वे गाड्या सुरू झाल्यास त्यातून परप्रांतातून येणाऱ्या प्रवाशांकडून कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे कोकण रेल्वे वाहतूक सुरू करण्याच्या निर्णयास सद्यस्थितीत स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, सिंधुदुर्गचे अध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी निवेदनातून जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.या निवेदनात उमेश गाळवणकर यांनी नमूद केले आहे की, सद्यस्थिती पाहता कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. तसेच सरकारच्या सर्व स्तरावरून कोरोना विषाणू संदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. तरीही राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असून प्रामुख्याने मुंबईमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जास्त आहे.कोकणातले बरेचसे लोक हे नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत स्थायिक आहेत. तसेच काही माणसे कोकणातून मुंबई येथे गेलेली आहेत. ती लॉकडाऊनमुळे अडकली आहेत. या सर्वांना कोकणात यायचे आहे हे खरे आहे. परंतु, ती मुंबई ते कोकण प्रवास करताना त्यात जर चुकून कुणी एखादा कोरोना संसर्ग झालेला असेल आणि त्यामुळे त्याचा संसर्ग इतरांना झाला तर त्यामुळे निर्माण होणारी स्थिती महाभयंकर असेल.बॅ. नाथ पै यांचे कोकण रेल्वेचे स्वप्न प्रा. मधु दंडवते व जॉर्ज फर्नांडिस यांनी पूर्ण केले ते कोकणच्या विकासासाठीच. परंतु हीच कोकण रेल्वे कोकणच्या जनतेला हानी पोहोचविण्यास कारणीभूत ठरणार असेल तर प्रसंगी सर्व जिल्हावासीयांना एकत्र येऊन संपूर्ण रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील रेल्वे ट्रॅकवर उतरावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
corona in sindhudurg-रेल्वे वाहतुकीस स्थगितीची मागणी : उमेश गाळवणकर : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 12:20 PM
कुडाळ : कोकणात येणाऱ्या रेल्वे गाड्या सुरू झाल्यास त्यातून परप्रांतातून येणाऱ्या प्रवाशांकडून कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे कोकण ...
ठळक मुद्देरेल्वे वाहतुकीस स्थगितीची मागणी : उमेश गाळवणकर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन