बांदा : बांदा पोलीसांनी सावंतवाडी तालुक्यातील भालावल येथे सापळा रचुन गोवा बनावटीची बेकायदा दारु वाहतुकी विरोधात कारवाई केली. या कारवाईत ३ लाख ७४ हजार ९२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
भालावल तिठा येथे गुरुवारी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशांमध्ये टाळेबंदी आदेश जारी असताना गोव्यातून महाराष्ट्रामध्ये मोठ्याप्रमाणात गोवा बनावटीच्या चोरट्या दारूची चोरट्या मार्गाने वहातुकीचे प्रमाण वाढलेले आहे. पण बांदा पोलिसानी सलग दोन दिवसांत दोन कारवाया करत परिसरात करडी नजर ठेवल्याचे सिद्द झाले आहे. यामुळे व्यावसायिकचे धाबे दणाणले आहे.
गोव्याहुन सावंतवाडी येथे गोवा बनावटीच्या चोरट्या दारुची मोठ्या प्रमाणात वहातूक होणार असल्याची पक्की खबर बांदा पोलीसांना मिळाल्याने भालावल येथे सापळा रचला होता. भालावल तिठा येथे गुरुवारी पहाटे १:३० वाजण्याच्या सुमारास कार आली असता कारमध्ये गोवा बनावटीचे वेगवेगळ्या प्रकारचे दारूचे खोके सापडून आले.
या कारवाईत १ लाख २४ हजार ९२० रुपयांच्या दारुसह दारु वाहतुकीसाठी वापरलेली २ लाख ५० हजार रुपयांची कार (एमएच ०४ डीडब्ल्यू १९३५) असा एकूण ३ लाख ७४ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बेकायदा दारु वाहतुकी विरोधात रविराज अंबाजी सावंत (२६, रा. तांबुळी, ता. सावंतवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड काँस्टेबल संजय हुंबे, पोलीस काँस्टेबल मनिष शिंदे, महेश भोई, बाळकृष्ण गवस, दादासो पाटील यांच्या पथकाने केली. महाराष्ट्र झ्र गोवा राज्याच्या सीमा सील असताना तसेच सर्वत्र पोलीस बंदोबस्त असतानाही गोव्यातून होणार्या दारु वाहतुकी बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बांदा पोलीस बांदा परिसरात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी चोक बंदोबस्तात व्यस्थ असुनही चोरट्या मार्गावर करडी नजर ठेऊन दारूवर कारवाईचा बडगा उचलले आहे. या उलट बांदा सटमठवाडी चेक नाक्यावरुन अवघ्या दोन किलो अंतरावरील इन्सुली राज्य उत्पादन शुल्क खात्याचे आफिस हे फक्त शोभेची बाहुली बनली आहे.
या आफीस मधील कर्मचार्याना कोरोनाचे सुख- दुःख आहे का तेही कळत नाही. फक्त ते आफिसमध्ये मुग गिळुन गप्प बसले आहे. दारू तस्करीची साटेलोटे असल्याचा आरोप काही जाणकार नागरिकांकडून होत आहे. संशयीताला गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर करणार असल्याचे बांदा पोलीसांनी सांगितले.अधीक तपास बांदा पोलीस करत आहेत.