सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णाची दूसरी चाचणी निगेटिव्ह आली आहे. ही बाब जिल्हावासीय व जिल्हा प्रशासन यांना दिलासा देणारी आहे. तसेच यामुळे जिल्ह्याची पावले कोरोनामुक्तच्या दिशेने सुरु झाली आहेत.
मेंगलोर एक्सप्रेस मधून मुंबई ते कणकवली प्रवास करताना(१८ रोजी) त्याला सहप्रवाशा कडून कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला होता.
दरम्यान कणकवली तालुक्यातील त्या रुग्णाचे कोरोना पोसिटीव्ह रिपोर्ट २६ मार्च ला प्राप्त झाल्या नंतर त्याला ओरोस येथील आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले होते.
१४ दिवसांनी त्याचे रिपोर्ट पुन्हा केले असता त्यातील एक रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. तर दिसरा रिपोर्ट येणे बाकी आहे. तो रिपोर्ट निगेटीव्ह आला तर त्या रुग्णाला डिस्चार्ज दिला जाणार आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय चाकूरकर यांनी लोकमत ला सांगितले.