सिंधुदुर्ग : जिल्हा सामान्य रुग्णाालयाकडे आज दुपारी कोरोना तपासणीचे 25 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 8 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 17 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.यामध्ये कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द येथील 1, हरकुळ बुद्रुक येथील 1, पियाळी येथील 1, सावंतवाडी तालुक्यातील सावंतवाडी येथील 1, माडखोल 1, इगवेवाडी 1 तर वैभववाडी तालुक्यातील वैभववाडी येथे 2 रुग्ण सापडले आहेत.
या सर्वाचे स्वॅब दिनांक 22 मे 2020 रोजी घेण्यात आले होते. त्यांचे अहवाल आज प्राप्त झाले आहेत. संध्याकाळी आणखी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर रुग्ण हा कुडाळ तालुक्यातील आहे.काल रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे प्राप्त अहवालामधील 6 व्यक्तींना कोविडची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील बावशी येथील 1, कुडाळ तालुक्यातील कवठी येथील 1, वेगुर्लां तालुक्यातील मांतोंड येथील 1, सावंतवाडी तालुक्यातील बांदा येथील 1, देवगड तालुक्यातील वाडा येथील 1 व टेंबवली येथील 79 वर्षीय मृत महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
आज अखेर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 39 झाली आहे. त्यापैकी 7 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तसेच एका रुग्णाचा मृत्यू झाला असून 1 रुग्ण उपचारांसाठी मुंबई येथे गेला आहे. सध्याा जिल्ह्यात 30 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.देवगड तालुक्यातील टेंबवली येथील ज्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिचा दिनांक 23 मे रोजी मृत्यू झाला होता. सदर महिला दिनांक 19 मे रोजी मुंबई येथून जिल्ह्यात आली होती. दिनांक 20 मे रोजी तिला रुग्णालयात दाखल करुन स्वॉब तपासणीसाठी घेण्यात आला होता. या महिलेस उच्च रक्तदाब आणि श्वसनाचा जुनाट आजार होता. दिनांक 28 मे रोजी अहवाल प्राप्त झालेले सर्व रुग्ण मुंबई येथून जिल्ह्यात आलेले आहेत. आल्यापासून हे सर्व रुग्ण संस्थात्मक अलगीकरणात आहेत.जिल्ह्यात सध्या कणकवली तालुक्यातील शिवडाव, डामरे, वैभववाडी तालुक्यातील मौजे तिरवडे तर्फ सौंदळ गावातील घागरेवाडी, मौजे कोळपे व मेहबुब नगर, ब्राह्मणदेववाडी, आणि उंबर्डे, सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे, कुडाळ तालुक्यातील पणदुर झ्र मयेकरवाडी, मालवण तालुक्यातील हिवाळे असे कंटेन्मेंट झोन आहेत.
संस्थात्मक अलगीकरणातील रुग्ण सापडलेल्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन करण्यात येणार नाही. ज्याठिकाणी रुग्ण गृह अलगीकरणात सापडले आहेत. त्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन करण्यात येणार आहेत.जिल्ह्यात एकूण 27 हजार 359 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून त्या पैकी 403 व्यक्ती या शासकीय संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. तर 5 हजार 864 व्यक्तींना गावपातळीवरील संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. नागरी क्षेत्रामध्ये 1 हजार 92 व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर जिल्ह्यात प्रवेश केलेल्या इतर सर्व नागरिकांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 1 हजार 651 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 1 हजार 386 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 39 अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरीत 1 हजार 348 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 264 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 112 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 69 रुग्ण डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलमध्ये, 36 रुग्ण डेडिकेटेड कोवीड हेल्थ केअर सेंटरमध्ये, कोविड केअर सेंटरमध्ये 7 रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी 6 हजार 691 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि. 2 मे 2020 पासून आज अखेर एकूण 51 हजार 246 व्यक्ती दाखल झाल्या आहेत.