खारेपाटण : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावाबरोबरच आजूबाजूच्या पंचक्रोशीतील इतर गावात मिळून एकाच दिवशी तब्बल १५ व्यक्तीचे स्वब तपासणी अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत.खारेपाटण येथे- १,नडगिवे येथे-४,तर वारगाव येथे सर्वाधिक १0 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील कोरोना बाधित व्यक्तीची संख्या ही ७५ वर जाऊन पोहोचली आहे. यामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ४२ एवढी असून बरे झालेले एकूण रुग्ण ३२ आहेत तर १ मृत आहे.ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर कोरोना बाधित व्यक्तीच्या संख्येत रोज होणारी वाढ नागरिकांच्या चिंतेत भर टाकणारी आहे. शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये वारगाव बौद्धवाडी येथे १६ आॅगस्ट रोजी एक व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली होती. तिच्या संपर्कातील कुटुंबातील ४ व्यक्तीचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
तर वारगाव रोडयेवाडी येथील एका व्यक्तीचा १६ आॅगस्टला एकाला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या कुटुंबातील ४ व्यक्तींचे तपासणी अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. तर वारगाव नरवाडी येथे १ तर रोडयेवाडी येथे १ असे मिळून वारगावात विविध ठिकाणी मिळून एकूण १0 कोरोना बाधित रुग्ण आढळले.तसेच नडगिवे मधलीवाडी येथे नव्याने ४ कोरोना बाधित रुग्ण आढळले. तर खारेपाटण कोंडवाडी १५ आॅगस्ट रोजी कोरोना मुळे मृत्यू झालेल्या १८ वर्षीय युवकाच्या कुटुंबातील एका व्यक्तीचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून आशाप्रकारे खारेपाटण पंचक्रोशीत विविध ठिकाणी आज एकूण १५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.
तर खारेपाटण पंचक्रोशी तसेच खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या चिंचवली, वायंगणी, बेर्ले, शिडवणे व साळीस्ते ता गावातून अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे या गावातील सरपंच व ग्रामसनियंत्रण समितीने कोरोनाला वेशिवरच रोखण्यासाठी केलेले प्रयत्न व कार्य कौतुकास पात्र आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली हा तालुका जिल्ह्यातील कोरोना चा ह्यहॉटस्पॉटह्ण तथा केंद्रबिंदू ठरत असतानाच आता कणकवली तालुक्यातील खारेपाटण हे गाव व पंचक्रोशी कोरोनाचे कणकवली तालुक्याचे हॉटस्पॉट ठिकाण ठरत आहे. त्यामुळे आता स्थानिक ग्रामपातळीवरील ग्रामस्तरीय सनियंत्रण समिती बरोबरच आरोग्य विभागा समोर कोरोनाचे मोठे संकट आवसून उभे राहिले आहे.खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ३७ जणांना कोरोनाची लागणखारेपाटण पंचक्रोशी ही कणकवली तालुक्यातील कोरोना संसगार्चे हॉट स्पॉट ठिकाण बनत चालले असून खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या वारगाव या गावी आजपर्यंत सर्वाधिक ३७ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून यामध्ये ३२ रुग्ण सक्रिय आहेत. तर आतापर्यंत ५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.यापाठोपाठ खारेपाटण मध्ये एकूण २७ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून यापैकी फक्त ६ रुग्ण सक्रिय आहेत व २0 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर १ मृत्यूची नोंद आहे. तसेच नडगिवे येथे आता पर्यंत एकूण ५ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून ४ रुग्ण सक्रिय आहेत.
१ रुग्ण यापूर्वीच बरा होऊन घरी गेलेला आहे. याच बरोबर कुरुंगावणे या गावी ५ कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. हे सर्व रुग्ण यापूर्वीच बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच शेर्पे या गावी सुद्धा १ कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. तो देखील बरा होऊन घरी गेला आहे.