सावंतवाडी : तालुक्यात बुधवारी २७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात शहरातील ७ जणांचा तर ग्रामीण भागातील २० जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे बांद्यात दिवसभरात नवे १० रुग्ण आढळून आले आहेत. तर सावंतवाडी शहरात बाधित व्यक्तीचा अहवाल वीस दिवसांनंतर पुन्हा पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ माजली आहे.सावंतवाडी तालुक्यात कोरोनाचा आलेख मागील चार दिवसांत कमी होत असताना बुधवारी पुन्हा एकदा रुग्ण वाढल्याने खळबळ माजली आहे. शहरातील सालईवाडा ३, खासकीलवाडा २, उभाबाजार व सबनीसवाडा येथील एकाचा समावेश आहे. तर ग्रामीण भागात बांद्यात १०, वेत्येत २, मळगाव ३, आंबोली १, इन्सुली १, आरोंदा १ आणि तळवडेमध्ये २ रुग्ण आढळले आहेत.सावंतवाडी तालुक्यातील रुग्ण संख्या ही ४४७ वर पोहोचली असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी सांगितले. तर सावंतवाडी शहरातील रुग्णसंख्या ही २०२ एवढी झाली आहे. शहरातील एका कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करून घरी सोडल्यावर तो खासगी रुग्णालयात पुन्हा चाचणी केली असता बाधित आढळल्याने खळबळ माजली आहे. याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
corona virus : सावंतवाडी तालुक्यात २७ जण कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 4:20 PM
सावंतवाडी तालुक्यात बुधवारी २७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात शहरातील ७ जणांचा तर ग्रामीण भागातील २० जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे बांद्यात दिवसभरात नवे १० रुग्ण आढळून आले आहेत. तर सावंतवाडी शहरात बाधित व्यक्तीचा अहवाल वीस दिवसांनंतर पुन्हा पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ माजली आहे.
ठळक मुद्देसावंतवाडी तालुक्यात २७ जण कोरोना बाधिततालुक्यातील रुग्ण संख्या ४४७ वर