कणकवली : कणकवली तालुक्यात कोरोना संक्रमण मोठ्या गतीने वाढत आहे. सोमवारी रॅपिड टेस्टमध्ये ३१ तर आर्टिपीसीआर टेस्टमध्ये १२ असे मिळून ४३ रुग्ण कोरोनाबाधित आले आहेत. त्यामुळे तालुक्यात आतापर्यंत सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६६३ झाली आहे. तर कणकवली शहरातील शिवाजीनगर परिसरातील एका वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत तालुक्यातील कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ७ झाली आहे.कणकवली शहरातील एक माजी नगरसेवक व एका खासगी डॉक्टरांची कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.सोमवारी तालुक्यात ४३ कोरोना बाधित व्यक्ती झाल्याचे आढळून आले असून कणकवली शहर ११, आशिये ९, हळवल ६, जानवली ५, फोंडा २, साकेडी १, कासार्डे २, तळेरे २, डामरे २ व तोंडवली येथील तिघांचा समावेश आहे. त्यापैकी रॅपिड टेस्टमध्ये ३१ व आर्टिपीसीआर तपासणीत १२ कोरोना बाधित आढळले आहेत. तसेच कुडाळ तालुक्यातील पोखरण येथील ५ व आंब्रड येथील १ असे ६ जण रॅपिड टेस्टमध्ये कोरोना बाधित आहेत.तळेरे ग्रामपंचायत बंदतालुक्यातील तळेरे ग्रामपंचायतीचा एक सदस्य व अन्य एक जण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस ग्रामपंचायत कार्यालय बंद राहणार असून सर्व कर्मचारी होम क्वारंटाईन झाले आहेत, अशी माहिती तेथील ग्रामसेवकानी दिली.
corona virus : कणकवली तालुक्यात सापडले नव्याने ४३ कोरोनाबाधित रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 3:58 PM
कणकवली तालुक्यात कोरोना संक्रमण मोठ्या गतीने वाढत आहे. सोमवारी रॅपिड टेस्टमध्ये ३१ तर आर्टिपीसीआर टेस्टमध्ये १२ असे मिळून ४३ रुग्ण कोरोनाबाधित आले आहेत. त्यामुळे तालुक्यात आतापर्यंत सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६६३ झाली आहे.
ठळक मुद्देकणकवली तालुक्यात सापडले नव्याने ४३ कोरोनाबाधित रूग्णसंख्या पोहोचली ६६३: एका वृद्धाचा कोरोनाने मृत्यू