मालवण : जिल्हाधिकारी यांच्या सशर्त परवानगीने सिंधुदुर्ग किनारपट्टीवर दिवाळी कालावधीत होडी वाहतूक आणि जलक्रीडा प्रकार सुरू करण्यात आले होते. मात्र प्रवासी होडी वाहतूक, पॅरासेलिंग व अन्य सागरी जलक्रीडा प्रकार तत्काळ बंद करण्याचे आदेश बंदर विभागाने दिले आहेत. यामुळे पर्यटन व्यावसायिकांत खळबळ उडाली असून बंदर विभागाच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. बंदर विभागाच्या या भूमिकेमुळे मालवणात आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला.कोरोना लॉकडाऊन काळात सर्वकाही ठप्प होते. मात्र कोरोना संक्रमण कमी झाल्याने शासनाने अनलॉक प्रक्रियेत अटी-शर्तींसह अनेक व्यवहार, सेवा सुरू केल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रमुख व्यवसाया पैकी एक असलेला पर्यटन व्यवसाय ठप्प होता. जिल्ह्याच्या पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मालवण येथील शेकडो पर्यटन व्यवसाईक मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. लोकप्रतिनिधी, प्रशासन यांचे लक्ष वेधण्यात आले.अखेर दिवाळी कालावधीत जिल्हाधिकारी यांनी प्रवासी होडी वाहतूक व साहसी जलक्रीडा परवानाधारक व्यावसायीकांना व्यवसाय करण्यास कोरोना खबरदारी नियम पाळून सशर्त परवानगी दिली. त्या नंतर पुन्हा एकदा पर्यटन बहरले. आठ महिने ठप्प असलेल्या पर्यटन व्यवसायाची गाडी काहीशी रुळावर येते आहे. असे चित्र असताना बंदर अधिकाऱ्यांनी किनारपट्टी वरील सर्व जलक्रीडा व प्रवासी होडी वाहतूक तात्काळ बंद करण्याचे आदेश शुक्रवारी व्यावसायीकांना दिले आहेत. अचानक निघालेल्या या आदेशामुळे पुन्हा एकदा पर्यटन ठप्प झाले आहे. मालवणात तब्बल आठ महिन्यानंतर दिवाळीपासून पर्यटनाला सुरूवात झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा या नव्या नियमावलीमुळे पयर्यटन ठप्प होणार आहे. त्यामुळे याबाबत व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.चौकटवरिष्ठांच्या आदेशाने निर्णय : सुषमा कुमठेकरकोरोना पार्श्वभूमीवर जलक्रीडा सुरू करताना ज्या मार्गदर्शक सूचना, नियम व अटी शर्तींसह जी बंधने आवश्यक आहेत. त्याबाबत कोणतेही आदेश बंदर विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त न झाल्याने सुरू असलेल्या जलक्रीडा बंद ठेवण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. अशी माहिती मालवण बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर यांनी दिली.रायगड अलिबाग येथे जलक्रीडा सुरू ठेवल्या प्रकरणी एक अधिकारी निलंबित करण्यात आले आहेत. या किनारपट्टीवर जलक्रीडा सुरू राहिल्यास आमच्यावरही तशी कारवाई होऊ शकते. त्यामुळे येथील सर्व जलक्रीडा बंद करण्याचे आदेश व्यवसायिकाना दिले आहेत, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
corona virus : होडी वाहतूक, जलक्रीडा प्रकारांना बंदर विभागाचा खो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 6:20 PM
sindhudurg , Fort, Malvan beach, collector, Tourisam सिंधुदुर्ग किनारपट्टीवर दिवाळी कालावधीत होडी वाहतूक आणि जलक्रीडा प्रकार सुरू करण्यात आले होते. मात्र प्रवासी होडी वाहतूक, पॅरासेलिंग व अन्य सागरी जलक्रीडा प्रकार तत्काळ बंद करण्याचे आदेश बंदर विभागाने दिले आहेत. यामुळे पर्यटन व्यावसायिकांत खळबळ उडाली
ठळक मुद्देहोडी वाहतूक, जलक्रीडा प्रकारांना बंदर विभागाचा खोमालवणात आलेल्या पर्यटकांचा झाला हिरमोड