सावंतवाडी : सावंतवाडी शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून शनिवारी दिवसभरात यात पाच रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये तीन रुग्ण हे कारागृहातील कैदी असल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. चार दिवसांपूर्वी कारागृहाचा कॉन्स्टेबल कोरोना बाधित आढळल्यानंतर आता कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याने कारागृह प्रशासन काय निर्णय घेते हे पहावे लागणार आहे.सावंतवाडी शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत ११० रुग्णसंख्या झाली असून यात शनिवारी पाच रुग्णांची भर पडली आहे. यातील दोन रुग्ण हे खासकिलवाडा व माठेवाडा या भागातील आहेत तर उर्वरित तीन रुग्ण हे सावंतवाडी कारागृहातील आहेत.कारागृहातील एक कॉन्स्टेबल कोरोना बाधित आढळून आला होता. त्यानंतर तीन कैदी कोरोना बाधित आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. हे कैदी आणखी कोणाच्या संपर्कात आले आहेत का हे पहावे लागणार आहे. तसेच कारागृहातील कैदीच कोरोना बाधित आढळून आल्याने कारागृह प्रशासन काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. पालिका कारागृहात निर्जंतुकीकरण करणार आहे. मात्र, कैद्यांबाबतचा निर्णय प्रशासन घेईल, असे स्पष्ट केले आहे.
corona virus : कारागृहातील तीन कैद्यांना कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 2:47 PM
सावंतवाडी शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून शनिवारी दिवसभरात यात पाच रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये तीन रुग्ण हे कारागृहातील कैदी असल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. चार दिवसांपूर्वी कारागृहाचा कॉन्स्टेबल कोरोना बाधित आढळल्यानंतर आता कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याने कारागृह प्रशासन काय निर्णय घेते हे पहावे लागणार आहे.
ठळक मुद्देकारागृहातील तीन कैद्यांना कोरोनाची बाधापोलीस कॉन्स्टेबलला झाली होती लागण