सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपर्यंत एकूण २३४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली. गुरुवारी नव्याने एक रुग्ण आढळल्यामुळे रुग्णसंख्या २६५ वर गेली आहे. अजूनही ४१ रुग्णांचा अहवाल मिळणे बाकी आहे.कोविड-१९ आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावास आळा घालण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या नियंत्रणाखाली व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चाकुरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे.कोविड-१९ या आजाराने त्रस्त असलेल्या गंभीर व अतिगंभीर रुग्णांच्या बाबतीत रुग्ण व्यवस्थापन संहिता, योग्य औषधोपचार, कोविड रुग्णालयात विशेषज्ज्ञ डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ यांची आवश्यकता सुनिश्चित करणे, याबाबत उपाययोजना निश्चित करणे व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने त्याची अंमलबजावणी करणे यासाठी टास्क फोर्स काम करणार आहे.या टास्क फोर्समध्ये शासकीय तसेच खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचा समावेश आहे. टास्क फोर्समध्ये समावेश असलेल्या डॉक्टर्सची नावे पुढीलप्रमाणे आहेत. डॉ. शंतनू तेंडोलकर, एम. डी. मेडिसीन, डॉ. वादीराज सवदत्ती, डॉ. बी. जी. शेळके, एम. डी. चेस्ट व टीबी, डॉ. सोनल घोगळ, एम. डी. मायक्रोबायोलॉजी, डॉ. महेश खलिपे, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. श्रीपाद पाटील, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा सामान्य रुग्णालय, डॉ. विवेक रेडकर, एम. डी. मेडीसीन यांचा समावेश करण्यात आला आहे.
corona virus : जिल्ह्यात कोविड-१९ साठी टास्क फोर्सची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 5:00 PM
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपर्यंत एकूण २३४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली. गुरुवारी नव्याने एक रुग्ण आढळल्यामुळे रुग्णसंख्या २६५ वर गेली आहे. अजूनही ४१ रुग्णांचा अहवाल मिळणे बाकी आहे.
ठळक मुद्देजिल्ह्यात कोविड-१९ साठी टास्क फोर्सची निर्मिती एक रुग्ण आढळला : संख्या २६५, आणखी पाच जणांची कोरोनावर मात