शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

corona virus : कोविड संपला असे गृहित धरू नका, शासनाचे नियम पाळा : दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 12:38 PM

Coronavirus, Deepak Kesarkar, sindhudurg नागरिकांनी कोविड संपला असे गृहित धरू नका. शासनाच्या नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. शाळा सुरू होत आहेत. मुलांच्या सुरक्षिततेसाठी मास्क, सॅनिटायझर शाळेत असणे आवश्यक आहे. यासाठी आमदार फंडातून तालुक्याला निधीही देण्यात येईल. तसेच पुढील काळात सुसज्ज अशी रुग्णवाहिका वेंगुर्ला तालुक्याला देण्यात येईल, असे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले.

ठळक मुद्देकोविड संपला असे गृहित धरू नका, शासनाचे नियम पाळा : दीपक केसरकर होडावडा ग्रामपंचायत नूतन इमारतीचे उद्घाटन

तळवडे : होडावडा ग्रामपंचायतीची अतिशय सुंदर इमारत उभारण्यात आली आहे. पुढील काळात या इमारतीच्या सभागृहासाठी निधी देण्यात येईल. तसेच तत्काळ ग्रामपंचायतीसाठी एक कॉम्प्युटर, प्रिंटर व प्रोजेक्टर या आठवड्यात देण्यात येईल. नागरिकांनी कोविड संपला असे गृहित धरू नका. शासनाच्या नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. शाळा सुरू होत आहेत. मुलांच्या सुरक्षिततेसाठी मास्क, सॅनिटायझर शाळेत असणे आवश्यक आहे. यासाठी आमदार फंडातून तालुक्याला निधीही देण्यात येईल. तसेच पुढील काळात सुसज्ज अशी रुग्णवाहिका वेंगुर्ला तालुक्याला देण्यात येईल, असे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले.वेंगुर्ला तालुक्यातील होडावडा ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे माजी गृहराज्यमंत्री, विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते फित कापून तसेच फलकाचे अनावरण करून उद्घाटन करण्यात आले. जनसुविधा योजना व १४ वा वित्त आयोगअंतर्गत या नूतन सुसज्ज ग्रामपंचायत इमारतीची उभारणी करण्यात आली आहे.यावेळी सभापती अनुश्री कांबळी, गटविकास अधिकारी उमा पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब, सदस्य सुनील मोरजकर, सरपंच अदिती नाईक, सचिन वालावलकर, निलेश चमणकर, मातोंड सरपंच जानवी परब, होडावडा उपसरपंच रसिका केळुसकर, उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, शहरप्रमुख अजित राऊळ, अण्णा वजराठकर, नम्रता बोवलेकर, देवा कांबळी, उपतालुकाप्रमुख शशिकांत परब, नितीन मांजरेकर, अरविंद नाईक, रवी केळुसकर, ग्रामपंचायत सदस्य सुरेखा परब, उत्तम धुरी, संदेश सावंत उपस्थित होते.ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिगंबर दळवी, रमाकांत नाईक तसेच विनामूल्य जमीन देणारे जमीन मालक रामचंद्र नाईक, प्रसाद नाईक, सर्व अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकDeepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग