corona virus : कुडाळ आगारप्रमुख धारेवर, काँग्रेस पदाधिकारी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 12:02 PM2020-12-07T12:02:19+5:302020-12-07T12:04:57+5:30
CoronaVirusUnlock, Kudal, StateTransport, Congress, Sindhudurgnews क्वारंटाईन वाहक-चालकांची जबाबदारी एसटी प्रशासन का टाळते? त्यांची जबाबदारी हे तुमचे कर्तव्य आहे की नाही? कर्तव्य बजावणाऱ्या सेवा देणाऱ्या वाहक-चालकांना आरोग्यविषयक सेवा सुविधा का उपलब्ध करून दिल्या नाहीत? असे सवाल कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विचारत कुडाळ एसटी आगारप्रमुख सुजित डोंगरे यांना धारेवर धरले.
कुडाळ : क्वारंटाईन वाहक-चालकांची जबाबदारी एसटी प्रशासन का टाळते? त्यांची जबाबदारी हे तुमचे कर्तव्य आहे की नाही? कर्तव्य बजावणाऱ्या सेवा देणाऱ्या वाहक-चालकांना आरोग्यविषयक सेवा सुविधा का उपलब्ध करून दिल्या नाहीत? असे सवाल कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विचारत कुडाळएसटी आगारप्रमुख सुजित डोंगरे यांना धारेवर धरले.
कुडाळ आजारातून मुंबई येथे बससेवा देण्यासाठी जाणाऱ्या कुडाळ तालुक्यातील चालक
-वाहकांच्या कोरोना तपासणीबाबत कुडाळ एसटी प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या दुर्लक्षाबाबत कुडाळ तालुका काँग्रेसच्यावतीने आगारप्रमुख कार्यालयात धडक दिली.
यावेळी काँग्रेसचे कुडाळ तालुकाध्यक्ष आबा मुंज, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष विजय प्रभू, माजी महिला काँग्रेस जिल्हा प्रेसिडेंट नीता राणे, भाजपाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य निलेश तेंडुलकर, तेंडोली सरपंच मंगेश प्रभू, कुडाळ तालुका सेक्रेटरी पांडू खोचरे, युवक काँग्रेसचे कुडाळ मालवण विधानसभा अध्यक्ष मंदार शिरसाट, युवक काँग्रेसचे कुडाळ शहर अध्यक्ष चिन्मय बांदेकर, युवक काँग्रेस कुडाळ तालुकाध्यक्ष म्हाडदळकर, सुंदर सावंत, उल्हास शिरसाट, तब्रेज मुजावर, तेंडोली ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ उर्फ गोट्या मेस्त्री, विनोद प्रभू आदी उपस्थित
होते.
यावेळी तेंडोली सरपंच मंगेश प्रभू यांनी सांगितले की, परजिल्ह्यात, मुंबई येथे सेवा बजावणाऱ्या जिल्ह्यातील चालक-वाहकांची कोरोना चाचणी योग्यप्रकारे झाली नाही. याचे कारण आपल्या आगारातील एक व्यक्ती कोरोना बाधित असतानाही त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आहे अशा प्रकारचा मेसेज आपण पाठविलात.
त्यामुळे ती बाधित व्यक्ती गावात सर्वत्र फिरली. त्यामुळे आता भविष्यात त्या गावात कोरोनाचे रुग्ण वाढल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल विचारत चुकीच्या पद्धतीने अहवाल देऊ नका. जाहीर करू नका असा सल्ला त्यांनी दिला.
यापुढे योग्य ती दक्षता घेतली जाईल : डोंगरे
विजय प्रभू व निलेश तेंडुलकर यांनी सांगितले की, कुडाळ आगारातून मुंबई येथे गेलेल्या प्रत्येक चालक-वाहकाची योग्य प्रकारे कोरोना तपासणी करण्यात यावी. त्यांना चांगल्या सोयी सुविधा द्याव्यात.
यावेळी डोंगरे म्हणाले की, मुंबई येथे जाणाऱ्या कुडाळ आगारातील चालक व वाहक यांच्या कोरोना तपासणीबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे. यापुढे योग्य ती दक्षता घेतली जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.