कणकवली : कणकवली तालुक्यात गुरुवारी नव्याने कोरोना बाधित ४५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये पोलीस ठाण्यातील ८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून ती आता ५२७ वर पोहोचली आहे.कणकवली तालुक्यात सातत्याने कोरोना बाधित व्यक्ती आढळत आहेत. तालुक्यात गुरुवारी आढळून आलेल्या ४५ रुग्णांमध्ये फोंडा १४, कनेडी ४, खारेपाटण १, वरवडे १, कणकवली शहर ११, कासार्डे १२, साकेडी १ व नांदगाव येथील १ व्यक्ती यांचा समावेश आहे. तालुक्यात कोरोनाची सर्वाधिक झळ कणकवली पोलीस ठाण्याला बसली आहे. अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने त्याचा दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे.तालुक्यातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागामार्फत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. यापूर्वी आढळलेल्या काही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयितांची बुधवारी रॅपिड टेस्ट केली असता त्यातील १५ जण पॉझिटिव्ह आले होते. त्यामध्ये हळवल ८, फोंडाघाट ४, कलमठ २, कणकवली शहर १ अशी रुग्ण संख्या आहे. तर गुरुवारीही नव्याने ४५ बाधित व्यक्ती आढळल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
corona virus : आठ पोलिसांना कोरोनाची लागण, कणकवली तालुक्यात ४५ रुग्ण सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2020 3:10 PM
कणकवली तालुक्यात गुरुवारी नव्याने कोरोना बाधित ४५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये पोलीस ठाण्यातील ८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून ती आता ५२७ वर पोहोचली आहे.
ठळक मुद्देआठ पोलिसांना कोरोनाची लागणकणकवली तालुक्यात ४५ रुग्ण सापडले