गिरीश परब सिंधुदुर्ग : सुरुवातीला कासवगतीने होणारी कोरोना रुग्णांची वाढ आता सुसाट वेगाने होऊ लागली आहे. मार्च ते जुलै या पाच महिन्यांच्या कालावधीत रुग्णसंख्या काहीशी आटोक्यात होती. मात्र, आॅगस्टनंतर त्याचा विस्फोट झाला आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली.
त्यातच जिल्हा रुग्णालयातील बहुतांशी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, तंत्रज्ञ कोरोनाबाधित सापडल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे आहे. खासगी डॉक्टरांनी सेवा देण्यास सुरुवात केली आहे. एकंदरीत कोरोनाची परिस्थिती आता हाताबाहेर चालली आहे.जिल्ह्यात रुग्णसंख्या सुसाट वेगाने वाढत आहे. त्यातच जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्याने अन्य वैद्यकीय अधिकारी यांच्यावर सेवेचा अतिरिक्त ताण पडत आहे. रुग्णांकडून कोणत्याही प्रकारच्या तक्रारी येत नाहीत. याचाच अर्थ जिल्हा रुग्णालयात चांगली सेवा दिली जात आहे.
२६ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. कणकवली तालुक्यातील हा रुग्ण ९ एप्रिल रोजी बरा झाला. हा रुग्ण मुंबईहून आला होता. रुग्ण सापडताच सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. कडक लॉकडाऊन जरी करण्यात आले. नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली. त्यानंतर दुसरा रुग्ण आढळला. तोही मुंबईहून आला होता. तोही रुग्ण बरा झाला.ज्यावेळी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होता तेव्हा रुग्णसंख्या कमी प्रमाणात होती. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जास्त होते. राज्यात हे प्रमाण ८८ टक्के होते. त्यामुळे राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दुसरा क्रमांक होता. मात्र, आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी झाले.पहिला रुग्ण ९ एप्रिल रोजी बरा होऊन घरी परतला. ११ जून रोजी ५०वा रुग्ण घरी परतला. १७ जून रोजी १०० वा रुग्ण घरी परला. ९ जुलै रोजी हा आकडा २०० वर गेला. ६ आॅगस्ट रोजी ३०० वा रुग्ण घरी परतला. १६ आॅगस्ट रोजी ४०० वा रुग्ण घरी परतला. २३ आॅगस्ट रोजी ५०० वा रुग्ण घरी परतला. २८ आॅगस्ट रोजी ६०० वा तर १ सप्टेंबर रोजी ७०० रुग्ण घरी परतला. ३ सप्टेंबर रोजी बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या ८०० झाली. ७ सप्टेंबर रोजी ९०० वा रुग्ण घरी परतला तर ९ सप्टेंबर रोजी १000वा रुग्ण घरी परतला. आता सक्रिय रुग्णसंख्या १00६ एवढी आहे.असे आढळले रुग्ण, संख्या पोहोचली २०८६जिल्ह्यात २५ वा रुग्ण २९ मे रोजी आढळला. ५० वा रुग्ण ३० मे रोजी आढळला. १०० वा रुग्ण ५ जून रोजी आढळला. २००वा रुग्ण २८ जून रोजी तर २४ जुलै रोजी ३०० वा रुग्ण आढळला. ३ आॅगस्ट रोजी ४०० वा रुग्ण आढळला. १० आॅगस्ट रोजी ५०० वा रुग्ण आढळला. १६ आॅगस्ट रोजी ६००वा रुग्ण आढळला.२० आॅगस्ट रोजी ७०० वा रुग्ण, २१ रोजी ८०० वा रुग्ण, २२ रोजी ९०० वा रुग्ण, २५ रोजी १००० वा रुग्ण, २९ रोजी ११०० वा रुग्ण, ३० रोजी १२०० वा रुग्ण आढळला. ४१ सप्टेंबर रोजी १३०० वा, २ रोजी १४०० वा, ४ रोजी १६०० वा, ५ सप्टेंबर रोजी १७०० वा रुग्ण आढळला. ४६ सप्टेंबर रोजी १८०० वा रुग्ण आढळला तर ८ सप्टेंबर रोजी १९०० वा रुग्ण आढळला. ९ सप्टेंबर रोजी रुग्णसंख्येने २००० चा टप्पा पार करून ती २०८६ झाली आहे.अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही लागणआॅगस्ट महिन्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होण्यास सुरुवात झाली. गणेश चतुर्थीदिवशी तब्बल १३४ रुग्ण आढळून आले. त्यानंतर आतापर्यंत सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. आता तर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, परिचारिका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाने आपल्या जाळ्यात ओढले आहे. त्यामुळे आता वाढत जाणाºया सक्रिय रुग्णसंख्येला सेवा पुरविताना अडचणी येत आहेत.