वैभववाडी : राज्यातील विविध आमदारांनी दिलेल्या १ कोटींच्या निधीतून खासदार नारायण राणेंच्या मेडिकल कॉलेजमध्ये कोविड सुरु करण्यात आली आहे. मात्र, शासकीय निधीतून सुरु केलेल्या या लॅबमध्ये कोरोना तपासणीसाठी २ हजार ८०० रुपये शुल्क आकारले जाते, ते कसे? कोविड लॅबसाठी राज्य शासनाचा निधी खर्च झाल्यामुळे राज्य शासनाच्या निकषानुसारच शुल्क आकारण्यात यावे, असे मत शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी प्रसिध्दी पत्रकातून व्यक्त केले आहे.रावराणे पत्रकात म्हटले आहे की, राणेंच्या मेडीकल कॉलेजमध्ये सुरु करण्यात आलेल्या लॅबसाठी आमदारांनी दिलेला निधी हा राज्य शासनाचा आहे. त्यामुळे या लॅबला राज्य शासनाचे निकष लागू होणे आवश्यक आहेत. परंतु तसे न करता या लॅबमध्ये कोरोना तपासणीसाठी २ हजार ८०० रुपये घेतले जात आहेत, असा आरोप करीत त्यांनी आमदार नीतेश राणेंवरही टीका केली आहे.आमदार राणे हे ट्वीटरच्या माध्यमातून कोरोना टेस्ट करुन येणाऱ्या चाकरमान्यांना क्वारंटाईन करु नये असे सांगत आहेत. एका अर्थी ते आपल्या लॅबची जाहिरात करीत आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांपैकी २५ टक्के लोकांनी जरी राणेंच्या लॅबमध्ये टेस्ट केली; तरी शासनाच्या पैशातून सुरु केलेल्या लॅबमधून त्यांना मोठा आर्थिक फायदा होणार असल्याचे रावराणे यांनी पत्रकात नमूद केले आहे.भैरी भवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरु केलेल्या ह्यबळीराजा आत्मसन्मानह्ण योजनेतंर्गत जिल्ह्यातील आर्थिक दुर्बल शेतकऱ्यांना आतापर्यंत २६ हजार काजू कलमांचे वितरण करण्यात आलेले आहे. या योजनेतून ५० हजार रोपांचे वितरण करण्यात येणार आहे.
परंतु, आॅगस्टनंतर काजू कलमांची लागवड करणे उचित नसल्याने उर्वरित २४ हजार रोपे पुढील हंगामात वितरीत करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना १५ टन सेंद्रीय खतांचेही वितरण करण्यात आले आहे. या योजनेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आम्ही हाती घेतलेल्या मिशन काजू क्रांतीचा पहिला टप्पा यशस्वी होताना दिसत आहे, असे रावराणे यांनी स्पष्ट केले आहे.देवेंद्र फडणवीस यांच्या कृतीवर टीकामुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी एका अधिवेशनात नारायण राणेंच्या गुन्हेगारी कृत्याचा पाढा वाचला होता. मात्र, त्यांनीच आता राणेंना नवीन उद्योगासाठी पक्षाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन दिला आहे. परंतु, भाजपचे निष्ठावंत माजी आमदार अॅड. अजित गोगटे चालवित असलेल्या देवगड आंबा प्रकिया उद्योगाला फडणवीस निधी देऊ शकले नाहीत. जर त्यांनी या प्रकल्पाला निधी दिला असता; तर हा प्रकल्प आज डबघाईला आला नसता. आणि या प्रकल्पातून जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना त्याचा फायदा झाला असता, अशी टीका रावराणे यांनी केली.