शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

corona virus : मृतदेह काढून इतरत्र दफन करा, सावंतवाडी माठेवाड्यातील नागरिकांची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 2:11 PM

सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथे आठवडाभरापूर्वी श्रीकृष्ण महादेव गिरी यांचा मृत्यू झाल्यानंतर ते दामोदर भारती मठाचे मठाधिपती असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी मठात मृतदेहाचे दफन केले होते. त्याला तेथील शेजाऱ्यांनी विरोध केला असून तो मृतदेह काढून दुसरीकडे दफन करा, अशी भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्दे मृतदेह काढून इतरत्र दफन करा, सावंतवाडी माठेवाड्यातील नागरिकांची भूमिका नगरपालिकेत बैठक, नगराध्यक्षांशी चर्चा

सावंतवाडी : शहरातील माठेवाडा येथे आठवडाभरापूर्वी श्रीकृष्ण महादेव गिरी यांचा मृत्यू झाल्यानंतर ते दामोदर भारती मठाचे मठाधिपती असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी मठात मृतदेहाचे दफन केले होते. त्याला तेथील शेजाऱ्यांनी विरोध केला असून तो मृतदेह काढून दुसरीकडे दफन करा, अशी भूमिका घेतली आहे.

नागरिकांनी त्याच दिवशी प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, नगरपालिका यांना निवेदने दिली होती. या निवेदनावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने माठेवाडा येथील नागरिकांनी नगराध्यक्ष संजू परब यांची नगरपालिकेत भेट घेतली.यावेळी शहरातील माठेवाडा परिसरामध्ये राजघराण्याची स्मशानभूमी आहे. त्या पलीकडे अन्य कोणाची स्मशानभूमी नाही. हवा असेल तर तसा ठराव नगरपालिकेच्या मासिक बैठकीत घेतला जाईल. दरम्यान, मागच्या शनिवारी दफन करण्यात आलेला मृतदेह कायदेशीर मार्गाने बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे आश्वासन संजू परब यांनी दिले माठेवाडा येथील नागरिकांना दिले.यावेळी नगरपालिकेकडून सल्लागार अ‍ॅड. पी. डी. देसाई, नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, शुभांगी सुकी, उत्कर्षा सासोलकर, बंटी पुरोहित तसेच माठेवाडा येथील किरण सिद्धये, बाळ चोडणकर, प्रकाश चोडणकर, अरुण वझे, गौरव माटेकर, गणेश पेंढारकर, पुंडलिक दळवी, सुनील प्रभू केळूसकर, भूषण कुलकर्णी, प्रथमेश चोडणकर, रघुनाथ खोटलेकर, मनोहर जगताप, उदय वझे, बाळकृष्ण घाटे, हनुमंत घाटे, सुनील सांगावकर, विष्णू बांदेकर, कुणाल सावंत, विशाल पवार, दीपक सावंत, रणधीर चव्हाण, नंदू गावडे तसेच देवस्थान समितीचे वकील एस. एस. ख्वाजा आदी यावेळी उपस्थित होते.परब म्हणाले, श्रीकृष्ण गिरी यांचा मृतदेह दफन करू नये म्हणून आम्ही पोलिसांशी चर्चा केली होती. मृतदेह कायदेशीर मार्गाने काढावा म्हणून मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी नगरपालिकेचे सल्लागार अ‍ॅड. पी. डी. देसाई यांच्याशी चर्चा केली होती.प्रांताधिकाऱ्यांचा नागरिकांकडून निषेधनगरपालिकेतील बैठकीनंतर माठेवाड्यातील नागरिक सावंतवाडी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना भेटण्यास गेले होते. मात्र, आपण झोपलो आहे. त्यामुळे मी आता भेट देऊ शकत नाही असे या नागरिकांना प्रांताधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले, अशी माहिती माठेवाडा येथील नागरिकांनी दिली.आम्ही एका महत्त्वाच्या कामासाठी तेथे गेलो असता आम्हाला भेट दिली नाही. भविष्यात माठेवाडा परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी अधिकारी म्हणून सुशांत खांडेकर यांची राहील, असा इशारा देत नागरिकांनी प्रांताधिकारी यांचा निषेध नोंदविला. यावेळी नागरिकांनी आपली भूमिका मांडली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडी