शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

CoronaVirus : जिल्ह्यातील २२२ गावे जोखिमग्रस्त, साथीच्या आजारांत विशेष लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 3:16 PM

जिल्हा आरोग्य विभागाने सन २०२०-२१ मधील जिल्ह्यातील जोखिमग्रस्त गावे निश्चित केली आहेत. मागील ३ वर्षे ज्या गावात लेप्टोस्पायरोसीस, जलजन्य साथीचे आजार उद्भवले आहेत अशी २२२ गावे प्रशासनाने जाहीर केली आहेत. या सर्व गावांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील २२२ गावे जोखिमग्रस्त, साथीच्या आजारांत विशेष लक्ष जिल्हा आरोग्य विभाग सतर्क

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा आरोग्य विभागाने सन २०२०-२१ मधील जिल्ह्यातील जोखिमग्रस्त गावे निश्चित केली आहेत. मागील ३ वर्षे ज्या गावात लेप्टोस्पायरोसीस, जलजन्य साथीचे आजार उद्भवले आहेत अशी २२२ गावे प्रशासनाने जाहीर केली आहेत. या सर्व गावांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.दरवर्षी जिल्हा आरोग्य विभाग पावसाळ्यात जोखिमग्रस्त गावे निश्चित करीत असतो. त्या गावात मागील ३ वर्षांत उद्भवलेल्या जलजन्य साथीच्या आजारांवर तो गाव जोखिमग्रस्त म्हणून जाहीर करतात. त्यानुसार लेप्टोस्पायरोसीसमध्ये वैभववाडी तालुक्यातील मांगवली, तिरवडे, कोकिसरे, देवगड तालुक्यातील गोवळ, गढीताम्हाणे, मुटाट, नाडण, कोटकामते, कुणकेश्वर, देवगड, जामसंडे, चाफेड; कणकवली तालुक्यातील शिवडाव, बोर्डवे, शिरवल, ओसरगाव, हळवल, वागदे, नाटळ, नरडवे, कोळोशी, नांदगाव, तरंदळे, साकेडी, कलमठ, वरवडे, जानवली, जांभुळगाव, साटमवाडी, कासार्डे; मालवण तालुक्यातील चिंदर, आचरा, त्रिंबक, पाडलोस, डांगमोडे, मर्डे, कोथेवाडा, धुरीवाडा, चाफेखोल, नांदरुख, मालवण शहर, किर्लोस, हिवाळे, ओवळीये, शिरवंडे, विरण, हेदूळ, चुनवरे, खोटले, सुकळवाड, कुसरवे, तळगाव, चाफेखोल यांचा समावेश आहे.कुडाळ तालुक्यातील कालेली, हुमरस, आकेरी, ढोलकरगाव, नारूर, कुपवडे, आंबेरी, निवजे, कांदुळी, झाराप, आंबडपाल, किनळोस, बिबवणे, मिटक्याचीवाडी, मांडकुली, घावनळे, नेरूर, मुणगी, कुडगाव, चेंदवण, केळुस, वालावल, गावधड, अणाव, ओरोस, आंब्रड, कसाल, पोखरण, पडवे, हुमरमळा, रानबांबुळी, गावराई, कुंदे, कुडाळ, वेताळबांबर्डे, पावशी, बोरभाटवाडी, डिगस, सरंबळ, पिंगुळी, टेंबगाव, ओरोस खुर्द, जांभवडे, भूतवडे, वर्दे, पांग्रड, सोनवडे.वेंगुर्ला तालुक्यातील आरवली, रेडी, परुळे, कालवी, निवती, होडावडा, तुळस, पाल, आरवली, उभादांडा, सुखटणगाव, वेंगुर्ला शहर, आवेरा, वजराठ, भंडारगाव, खानोली, राजापूरकरवाडी, मठ, वेतोरे, दाभोली. सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली, निगुडे, मडुरा, शेर्ले, बांदा, रोणापाल, नेतर्डे, सातोसे, गाळेल, कास, भिकेकोनाळ, पाडलोस, डिंगणे, आरोसबाग, आंबोली, चौकुळ, माडखोल, भोम, आरोस, तिरोडा, किनळे, आजगाव, आरोंदा, मळेवाड, सोनुर्ली, धाकोरा, कवठणी, वेर्ले, कुणकेरी, कोलगाव, सांगेली, कारिवडे, कलंबिस्त, शिरशिंगे, सावरवाड, मळगाव, ओटवणे, नेमळे, चराटे, निरवडे, तळवडे (कुंभारगाव).दोडामार्ग तालुक्यातील सासोली, कसई, पाटये पुनर्वसन, पडवे, माजगाव, गिरोडे, गावठाण, आंबेरी, मणेरी, आडाळी, कळणे, उगाडे, डेगवे(मोयझर), पडवे, मोरगाव, तिलारी, निळेली, असनिये, तळकट, कुंब्रल, कुडासे, झोळंबे, भेकुर्ली, कोलझर, शिरवल, तांबुळी, भालावल, कोनशी, घारपी, पणतुर्ली, फुकेरी या गावांचा समावेश आहे.जलजन्य साथग्रस्त गावेदेवगडमधील मणचे, कुणकेश्वर; वेंगुर्ल्यातील सोन्सुरे, शेळपी, वायंगणी या गावांचा जलजन्य साथग्रस्त गावात समावेश आहे. या गावांमध्ये विशेष काळजी घेण्यात येणार आहे. या गावात लेप्टोस्पायरोसीस किंवा जलजन्य साथीचे रुग्ण सापडू नयेत यासाठी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांचे विशेष लक्ष असेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यsindhudurgसिंधुदुर्ग