लोकमत न्यूज नेटवर्कसिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मे महिन्यात परराज्यातून व महाराष्ट्रातून तब्बल ५१ हजार २४६ नागरिक दाखल झाले आहेत. तर आज ६ हजार ६९१ व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.२८ मे रोजी अहवाल प्राप्त झालेले सर्व रुग्ण मुंबई येथून जिल्ह्यात आलेले आहेत. आल्यापासून हे सर्व रुग्ण संस्थात्मक अलगीकरणात आहेत. जिल्ह्यात सध्या कणकवली तालुक्यातील शिवडाव, डामरे, वैभववाडी तालुक्यातील मौजे तिरवडे तर्फ सौंदळ गावातील घागरेवाडी, मौजे कोळपे व मेहबुब नगर, ब्राह्मणदेववाडी आणि उंबर्डे, सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे, कुडाळ तालुक्यातील पणदुर - मयेकरवाडी, मालवण तालुक्यातील हिवाळे असे कंटेन्मेंट झोन आहेत. संस्थात्मक अलगीकरणातील रुग्ण सापडलेल्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन करण्यात येणार नाही. ज्याठिकाणी रुग्ण गृह अलगीकरणात सापडले आहेत. त्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन करण्यात येणार आहेत.परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ मे २०२० पासून आज अखेर एकूण ५१ हजार २४६ व्यक्ती दाखल झाल्या आहेत. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत मुंबई, पुणे व इतर बाधित क्षेत्रातून सिंधुुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणाºया नागरिकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी काळात ती डोकेदुखी ठरणार आहे.जिल्हा रूग्णालयातील विलगीकरण कक्षात ११२ रूग्ण दाखलजिल्ह्यात एकूण २७ हजार ३५९ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून त्यापैकी ४०३ व्यक्ती या शासकीय संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. तर २५ हजार ८६४ व्यक्तींना गावपातळीवरील संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. नागरी क्षेत्रामध्ये १ हजार ९२ व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर जिल्ह्यात प्रवेश केलेल्या इतर सर्व नागरिकांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण १ हजार ६५१ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी १ हजार ३८६ तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील ३९ अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरीत १ हजार ३४८ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून २६४ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या ११२ रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी ६९ रुग्ण डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये, ३६ रुग्ण डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये, कोविड केअर सेंटरमध्ये ७ रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी ६ हजार ६९१ व्यक्तींची तपासणी करण्यात आली.बाधित रूग्णांमध्ये चाकरमान्यांचाच समावेशसिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी गावागावात दाखल झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात आढळलेल्या रूग्णांमध्ये मुंबईकर चाकरमान्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची स्थिती पाहता आगामी काळात कोरोनाच्या रूग्णांना सेवा देताना प्रशासनाच्या नाकीदम येणार आहेत, एवढे मात्र, निश्चित.
CoronaVirus : जिल्ह्यात ५१ हजार नागरिकांचा प्रवेश, आरोग्य प्रशासनाची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 5:34 PM
लोकमत न्यूज नेटवर्क सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मे महिन्यात परराज्यातून व महाराष्ट्रातून तब्बल ५१ हजार २४६ नागरिक दाखल झाले ...
ठळक मुद्देकोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय मुंबईतून येणाऱ्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ