सावंतवाडी : माजी मंत्री दीपक केसरकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी फोनवरून संपर्क साधून सिंधुदुर्गमधील मुलांना गोव्यात नोकरीसाठी घ्या, असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला गोव्याने प्रतिसाद दिला असून याबाबतची नावनोंदणी येथील तहसीलदार कार्यालयात सुरू झाली.
नावनोंदणीसाठी आलेल्या सर्व युवक-युवतींची स्वॅब तपासणी पूर्ण केल्यानंतरच सर्वांना गोव्यात पाठविले जाणार असल्याची भूमिका तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी घेतली आहे. दरम्यान, सायंकाळी पाच पर्यंत ५७० नावाची नोंदणी येथील तहस्ीालदार कार्यालयात झाली होती.लॉकडाऊनमुळे गोव्यात जाणाºया युवक-युवती सिंधुदुर्गमध्येच अडकून पडले आहेत. त्यामुळे अनेकांच्या रोेजीरोटीचा प्रश्न गंभीर झाला असून काहींना तर कामालाही सध्या बोलावले जात नाही. त्यामुळे या प्रश्नात स्वत: दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री दीपक केसरकर यांनी लक्ष घातले आणि त्यांनी थेट गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क केला.
मुख्यमंत्री सावंत यांनी या प्रश्नात गंभीरपणे लक्ष घातले जाईल तसेच गोव्यात नोकरीसाठी येणाऱ्या युवक युवतींची नोंदणी करा व ती गोव्याला पाठवा, असे आवाहन केले होते.त्याप्रमाणे मंगळवारी येथील तहसीलदार कार्यालयात अधिकृतपणे नावनोंदणी झाली.