शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

CoronaVirus Lockdown : कणकवली शहरात राखीव पोलीस तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 5:31 PM

संचारबंदीचे नियम कडक आणि काटेकोर करूनही जनतेकडून त्या नियमांना हरताळ फासला जात आहे. कणकवली शहरात आणि बाजारपेठांमध्ये याचे प्रत्यंतर दररोज येत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या नावाखाली अनेक नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना लाथाडून बाजारपेठांमध्ये गर्दी करण्यात येत होती. याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी सायंकाळ पासून कणकवलीत संचारबंदी कडक केली. 

ठळक मुद्देकडक संचारबंदी ! बॅरिकेट्स लावून अंतर्गत रस्ते रोखले पोलीस अधिकाऱ्यांसह राखीव पोलीस तैनात

कणकवली : संचारबंदीचे नियम कडक आणि काटेकोर करूनही जनतेकडून त्या नियमांना हरताळ फासला जात आहे. कणकवली शहरात आणि बाजारपेठांमध्ये याचे प्रत्यंतर दररोज येत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या नावाखाली अनेक नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना लाथाडून बाजारपेठांमध्ये गर्दी करण्यात येत होती. याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी सायंकाळ पासून कणकवलीत संचारबंदी कडक केली. कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये यासाठी देशात संचारबंदी लागू करण्यात आली. माणुसकीच्या भावनेतून नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी पोलिसांनी अनेक वेळा बाजारपेठेत आलेल्या ग्राहकांच्या बाबतीत लवचिक धोरण स्विकारले. मात्र, त्याचा अनेक गैरफायदा घेतला जाऊ लागला. त्यामुळे बाजारपेठेत गर्दीचे प्रमाण वाढू लागले .ही गर्दी फक्त कणकवली पुरती मर्यादित न रहाता इतरही बाजारपेठांमध्ये पहायला मिळू लागली. तसेच काही दुचाकी चालक विनाकारण फेरफटका मारतानाही पोलिसांनी पकडले . नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे हे पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री बारा वाजल्यापासून दुचाकी शहरात कुठेही फिरवल्या जाऊ नये, लोकांचे विनाकारण फेरफटके बंद व्हावे, यासाठी नाकाबंदीचे आदेश दिले.त्याची अंमलबजावणी कणकवलीत मंगळवारी सायंकाळ पासूनच करण्यात आली. बुधवारी सकाळपासून तर संचारबंदी आणखीनच कडक करण्यात आली. स्थानिक पोलिसांसह राखीव पोलीस फोर्स सुद्धा तैनात करण्यात आली आहे. अप्पासाहेब पटवर्धन चौक ते बाजारपेठ, नागवे रोड, डीपीरोड, नरडवे रोड ते रेल्वे स्टेशन व अन्य भागातील रस्ते बंद करण्यात आले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर व पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी स्वतः बंदोबस्तावर लक्ष ठेवून होते. त्यामुळे गर्दीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळविण्यात यश आले होते. पोलिसांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अनेक नागरिकानी घरीच राहणे पसंत केले.जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट !संचारबंदीबाबत पहाणी करण्यासाठी बुधवारी जिल्हा पोलिस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम यांनी कणकवलीला भेट दिली. बाजारपेठेत फेरफटका मारत अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. तसेच सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याबाबत व्यापारी व नागरीकाना सूचना केल्या. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसsindhudurgसिंधुदुर्ग