ठळक मुद्देवाहने ताब्यात घेण्यासाठी पोलीस स्थानकात गर्दी
कणकवली : कणकवली शहरात संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर जप्त केलेली वाहने ताब्यात घेण्यासाठी वाहनमालकांनी कणकवली पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करीत कणकवलीत पोलीस ठाण्याच्या आवारात जप्त करण्यात आलेली वाहने उभी करून ठेवण्यात आली होती.वाहन जप्त करताना ५ मे रोजी गाडीमालकांना कणकवली पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्यानुसार वाहन मालक मंगळवारी गाडी ताब्यात मिळेल या आशेने आल्याने कणकवली पोलीस ठाण्याच्या परिसरात गर्दी झाली होती.मात्र, लॉकडाऊन कालावधी वाढविल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतर वाहने ताब्यात देण्याविषयी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.