वैभववाडी : जनतेच्या आरोग्यापेक्षा आम्हाला दुसरे काहीही महत्त्वाचे वाटत नाही. त्यामुळे कोणाचेही फोन आले तर तुम्ही वितळून जाऊ नका. कोणाचीही चूक अजिबात चालणार नाही. बदलापूर हा कोरोनाचा हॉटस्पॉट आहे. तेथून आचिर्णेत लोक आले आहेत. त्यांची तुम्ही तपासणी केलीत काय? असा संतप्त सवाल आमदार नीतेश राणे यांनी तहसीलदार आणि तालुका आरोग्य अधिकारी यांना आढावा बैठकीत केला.आमदार राणे यांनी तहसील कार्यालयात ह्यकोरोनाह्णच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. यावेळी तहसीलदार रामदास झळके, नगराध्यक्षा अक्षता जैतापकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे, भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, पंचायत समिती सदस्य अरविंद रावराणे, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सूरज कांबळे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नवनाथ नवनाथ कांबळे, पुरवठा अधिकारी संभाजी खाडे, शिवराज चव्हाण उपस्थित होते.
कोरोनामुळे हॉटस्पॉट ठरलेल्या बदलापुरातून काही लोक आचिर्णे येथे आले आहेत. तसेच होम क्वारंटाईन व्यक्तीला शिवभोजन योजनेचा ठेका दिला गेला होता. अशा प्रकारांतून कोरोनाचा प्रसार झाला तर तालुक्याचे काय होईल? याचा विचार करा. राजकीय नेते आणि सामान्य जनता असा फरक करु नका, असे खडे बोल आमदार राणे यांनी तहसीलदार झळके यांना सुनावले.आरोग्य विभागाचा आढावा घेताना होम क्वारंटाईनमध्ये खूपच हलगर्जीपणा दिसून येत आहे. या संकटाला इतकेही सहज घेऊ नका. लोकांच्या आयुष्यापेक्षा आम्हाला काहीच महत्त्वाचं वाटत नाही. त्यामुळे चुका करु नका, असा इशारा राणे यांनी अधिकाऱ्यांना दिला.आमदार राणे यांनी धान्य पुरवण्याची माहिती घेतली. त्यावेळी शिधापत्रिका नसलेल्या लोकांना धान्य देण्याबाबत केंद्र सरकारने अधिसूचना काढलेली असताना त्यांना धान्य का देत नाही? त्या लोकांनी काय करायचे? अशी विचारणा केली. त्यावर वरिष्ठ कार्यालयाकडून जादा पुरवठा झालेला नाही. मात्र, अशा लोकांची माहिती संकलित करुन जिल्ह्याला पाठविण्यात आली आहे असे झळके व पुरवठा अधिकारी खाडे यांनी स्पष्ट केले....तर सक्षम पर्याय निर्माण कराआठवडा बाजाराच्या निमित्ताने आजूबाजूच्या गावातून लोक येतात. ते भाजीपाला व अन्य वस्तू घेऊन जातात. बुधवारचा आठवडा बाजार बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला असाल; तर बाजारात येणाºया शहराबाहेरच्या लोकांना सक्षम पर्याय निर्माण करुन द्या, अशी सूचना आमदार नीतेश राणे यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना केल्या.अन्य रुग्णांसाठी खासगी सहकार्य घ्याशासकीय आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या मोहिमेत आहे. त्यामुळे अन्य आजारांच्या रुग्णांबाबत काय नियोजन आहे. याबाबत माहिती घेत. अन्य रुग्णांना तपासणी व उपचारांसाठी खासगी 'डॉक्टर्स'चे सहकार्य घ्या. जे डॉक्टर्स सहकार्य करण्यास तयार असतील 'त्या' डॉक्टर्सची यादी रुग्णांच्या माहितीसाठी जाहीर करा, अशी सूचना नीतेश राणे यांनी आरोग्य विभागाला केली.