शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
3
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
4
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
5
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
6
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
7
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
8
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
9
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
10
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
11
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
12
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
13
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
14
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."
15
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
16
कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC
17
सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अ‍ॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
18
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
19
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
20
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

CoronaVirus Lockdown : फुलून येणारे धबधबे पर्यटकांअभावी सुने-सुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 4:46 PM

पावसाळा सुरू होताच पर्यटकांचा ओघ डोंगरावरून कोसळणाऱ्या धबधब्यांकडे वळू लागतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे देवगड तालुक्यातील तळवडे-न्हावनकोंड व मणचे व्याघे्रश्वर हे धबधबे पर्यटकांबरोबर स्थानिकांना पर्वणीच ठरत आहेत. मात्र, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी फुलून येणारे हे धबधबे पर्यटकांअभावी सुने-सुने दिसत आहेत.

ठळक मुद्दे पर्यटकांनी फुलून येणारे धबधबे पर्यटकांअभावी सुने-सुने देवगड तालुक्यातील तळवडे-न्हावनकोंड, मणचे व्याघे्रश्वर धबधबे निवांत

अयोध्याप्रसाद गावकर देवगड : पावसाळा सुरू होताच पर्यटकांचा ओघ डोंगरावरून कोसळणाऱ्या धबधब्यांकडे वळू लागतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे देवगड तालुक्यातील तळवडे-न्हावनकोंड व मणचे व्याघे्रश्वर हे धबधबे पर्यटकांबरोबर स्थानिकांना पर्वणीच ठरत आहेत. मात्र, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी फुलून येणारे हे धबधबे पर्यटकांअभावी सुने-सुने दिसत आहेत.उन्हाळा संपल्यानंतर पावसाने जून महिन्याच्या सुरुवातीलाच हजेरी लावली. जून महिन्याच्या सुरुवातीलाच मुसळधार पाऊस सुरू झाल्याने निसर्गाचे सौंदर्य खऱ्या अर्थाने फुलू लागले. सध्याच्या दगदगीच्या जीवनात प्रत्येकाला निवांतपणे आनंदात कसे जगता येईल अशी क्षणभर विश्रांती हवी असते.

आठवड्याच्या कामाचा ताणतणाव दूर करण्यासाठी गावात किंव एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात सुटी घालवायला प्रत्येकालाच आवडते. हिरवीगार झाडे, चहूकडे पसरलेली हिरवळ, वेगवेगळे पक्षी आणि खळाळणारा धबधबा असे मनमोहक रुप डोळ्यासमोर दिसताच दिवसभराचा थकवा कधी गायब होतो हे कळतच नाही, असे येथील धबधबा पाहताना अनुभवास येते. मात्र, यावर्षी पर्यटकांना अनोखी पर्वणी ठरणारे धबधबे लॉकडाऊनमुळे पर्यटकच येत नसल्याने सुने-सुने दिसत आहेत.तळवडे येथील न्हावनकोंड धबधबा हा अल्पावधीतच मोठ्या प्रमाणा प्रसिद्धी मिळालेला व पर्यटकांना आकर्षित करणारा धबधबा ठरला आहे. अतिशय सुंदर, सुरक्षित व रस्त्याच्या नजीकच असलेला व पर्यटन निधीतून विकसित करण्यात आलेल्या या धबधब्याकडे येथील स्थानिकांसह पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

मणचे येथील व्याघे्रश्वरच्या धबधब्यावरही पर्यटक व स्थानिकांची रेलचेल कायमच असते. तसेच तालुक्यातील पावसाच्या पाण्यावरती प्रवाहित झालेल्या ओहोळावरती व तलावांमध्येही मनसोक्तपणे आनंद लुटण्यासाठी स्थानिकांची गर्दी दिसून येते.समुद्रकिनारी मनसोक्तपणे आनंद घेणाऱ्या पर्यटकांचा ओढा पावसाळ्यामध्ये साहजिकच धबधब्यांकडे वळतो. विशेषत: शनिवार-रविवारी सुटीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी दिसून येते. या धबधब्यांवर मनसोक्तपणे भिजताना पर्यटकांना विशेष आनंद होतो. धबधब्याच्या ठिकाणी भोजनाचाही कार्यक्रम आयोजित केला जातो.मात्र, यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. कोरोनामुळे लॉकडाऊन केल्याने लोक अद्यापही घरीच आहेत. बाहेर पडताना सोशल डिस्टन्सिंग पाळावे असे आदेश असल्याने या धबधब्यांकडे पर्यटक येत नाहीत. याशिवाय शासनाने अनेक धबधबे बंद ठेवावेत, असे आदेशही काढल्याने पर्यटक नाराज झाले आहेत. त्यामुळे हे धबधबे सुने-सुने वाटत आहेत.

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग