शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

CoronaVirus Lockdown : त्या कुटुंबियांनाही क्वारंटाईन करा, आचऱ्याच्या माजी सरपंचांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 10:50 AM

संस्थात्मक क्वारंटाईन केलेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही होम क्वारंटाईन करण्याची मागणी आचरा सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्याकडे आचरा गावचे माजी सरपंच राजन गावकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देत्या कुटुंबियांनाही क्वारंटाईन करा, आचऱ्याच्या माजी सरपंचांची मागणीसहाय्यक पोलीस निरीक्षकांची घेतली भेट

आचरा : आचरा परिसरातून कोरोना बाधित क्षेत्रात आंबा, भाजीपाला वाहतुकीच्यादृष्टीने गेलेले चालक व त्यांचे सहकारी यांना संस्थात्मक व होम क्वारंटाईन केले आहे. परंतु ते गावात परतल्यानंतर त्यांचा संपर्क त्यांच्या घरातील माणसांशी आला आहे, अशा कुटुंबातील माणसे राजरोसपणे सार्वजनिक ठिकाणी फिरत आहेत त्यांचा गावातील वाडीतील लोकांशी संपर्क येत आहे.

जर संस्थांत्मक क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्याचा भुर्दंड सगळ्यांना भोगावा लागणार असल्याने संस्थात्मक क्वारंटाईन केलेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही होम क्वारंटाईन करण्याची मागणी आचरा सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्याकडे आचरा गावचे माजी सरपंच राजन गावकर यांनी केली आहे.आचरा गाउडवाडी भागात कोरोना बाधित भागातून प्रवास करून किंवा वाहने घेऊन आलेल्या चालकांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून गावाच्या सुरक्षेसाठी आचरा गावचे माजी सरपंच राजन गावकर यांच्या समवेत जगदीश पांगे, अनिल करंजे व ग्रामपंचायत सदस्या अनुष्का गावकर यांनी आचरा पोलिसांची भेट घेत संस्थात्मक क्वारंटाईन केलेल्यांच्या कुटुंबाही दक्षता म्हणून होम क्वारंटाईन करण्याची मागणी यावेळी केली.आज पालकमंत्री सामंत व भाजपचे प्रमोद जठार हे मुंबईतील चाकरमानी यांना गावी आणणार असे सांगत आहेत. यामुळे गावात मुंबईस्थित चाकरमानी आले तर कोरोना फैलावणार तर नाही ना अशी भीती ग्रामीण भागातील प्रत्येकाला निर्माण झाली आहे.मात्र, मुंबईकर यांना गावी आणण्याएवढी आपल्या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा तेवढी सक्षम आहे का? तेवढे व्हेंटिलेटर आहेत का?, आरोग्य विभागात तेवढा स्टाफ आहे का? असे अनेक प्रश्न प्रत्येक ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनात आहेत.याची माहिती पालकमंत्री यांनी अगोदर द्यावी नंतरच मुंबईस्थित चाकरमानी यांना आणण्यासाठी प्रयत्न करावेत जर यंत्रणा सक्षम नसेल तर येथे प्रेतांचे खच पडतील अशी भीती गावकर यांनी व्यक्त केली. याचा सारासार विचार करूनच मुंबईस्थित लोकांना गावी आणण्याचा निर्णय घ्यावा, असे राजन गावकर म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस