शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

CoronaVirus Lockdown : करुळ पोलीस नाक्याचे स्थलांतर करा, पालकमंत्र्यांकडे केली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 2:04 PM

तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करुळ तपासणी नाका वस्तीच्या मध्यभागी असल्याने स्थानिक लोकांना त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे सध्याचा पोलीस तपासणी नाका दिंडवणेपाटी येथे स्थलांतरित करावा, अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे जिल्हा बँकेचे संचालक दिगंबर पाटील यांनी केली आहे.

ठळक मुद्देकरुळ पोलीस नाक्याचे स्थलांतर करा, पालकमंत्र्यांकडे केली मागणीलॉकडाऊनपासून स्थानिकांना होतोय त्रास; दिगंबर पाटील यांनी केली मागणी

वैभववाडी : तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करुळ तपासणी नाका वस्तीच्या मध्यभागी असल्याने स्थानिक लोकांना त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे सध्याचा पोलीस तपासणी नाका दिंडवणेपाटी येथे स्थलांतरित करावा, अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे जिल्हा बँकेचे संचालक दिगंबर पाटील यांनी केली आहे.याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन पाटील यांनी करुळ तपासणी नाका दिंडवणेपाटी येथे स्थलांतरित करण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत होते.

निवेदनात असे म्हटले आहे, करुळ माध्यमिक विद्यालयानजीक पोलीस तपासणी नाका आहे. या मार्गावरील ये-जा करणाऱ्या वाहनांची येथे तपासणी केली जाते. या नाक्यामुळे चोरी, तस्करीचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. परंतु, लॉकडाऊन काळातील संचारबंदीमुळे करुळ गावातील भट्टीवाडी, दिंडवणे, खडकवाडी या तीन वस्त्यांमधील नागरिकांना आता हा तपासणी नाका अक्षरश: नकोसा झाला आहे.

लॉकडाऊनच्या घोषणेनंतर या तीनही वाडीतील लोकांना जीवनाश्यक वस्तू खरेदीसाठी गावातील बँक, किराणा आणि रास्त दुकानावर किंवा वैभववाडी बाजारपेठेत येणे मुश्किल झाले आहे. या तिन्ही वाड्या पोलीस तपासणी नाक्याच्या पलिकडे असल्यामुळे संचारबंदी लागू झाल्यापासून गावातील वाहनांना तालुक्यात येण्यास प्रवेश बंदी आहे.ई-पास असेल तरच या तपासणी नाक्यावरुन तीन वाडीतील ग्रामस्थांना गावात किंवा तालुक्यात सोडले जाते. स्वत:च्या गावात जाण्यासाठी सुध्दा येथील लोकांना परवानगी नाही. त्यामुळे येथील लोक हैराण झाले आहेत.

या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करुन करुळ तपासणी नाका या तीन वस्त्यांच्या शेवटच्या टोकाला स्थलांतरित करुन स्थानिकांची या त्रासातून सुटका करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे, असे पाटील यांनी पालकमंत्री सामंत यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग