रामचंद्र कुडाळकर तळवडे : देशात सध्या कोरोना विषाणू थैमान घालत आहे. त्याच्या प्रतिबंधासाठी राज्य सरकार चांगल्या प्रकारे काम करीत आहे. पुणे, मुंबई येथून चाकरमानी आपल्या गावी येत आहेत. या चाकरमान्यांना क्वारंटाईन करण्यासाठी जिल्हा परिषद शाळा, इमारती कमी पडत आहेत. अशा या परिस्थितीत सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूल (साई होली फेथ हायस्कूल), दर्शन विद्या एज्युकेशन संस्था संचलितची इमारत शाळेचे अध्यक्ष डॉ. शेखर जैन यांनी निरवडे ग्रामपंचायत प्रशासनास क्वारंटाईनसाठी दिली.सध्या परजिल्ह्यातून तसेच मुंबई येथून मोठ्या संख्येने लोक गावाकडे येत आहेत. गावागावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच माध्यमिक विद्यालय आणि खासगी संस्था इमारतीत या सर्वांना क्वारंटाईत केले जात आहे.मात्र, सध्या जागेची कमतरता असल्याने व मुबलक सुविधा ग्रामीण भागातील शाळात नसल्याने काही ठिकाणी चाकरमान्यांना त्रास होत आहे. याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक आपली काळजी घेताना दिसत आहेत. काही समाजसेवक आपल्यापरीने सहकार्य करीत आहेत.निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूल (साई होली फेथ हायस्कूल)चे अध्यक्ष डॉ. शेखर जैन यांनी कोरोना संक्रमण काळात आपल्या स्कूलची इमारत निरवडे ग्रामपंचायत प्रशासनाला लोकांना क्वारंटाईनसाठी मोफत वापरण्यास दिली. जिल्ह्यातही असे समाजसेवक पुढे सरसावले तर मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होऊ शकते.
मी माझ्या संस्कार नॅशनल स्कूल (साई होली फेथ हायस्कूल)ची इमारत कोरोना काळात निरवडे ग्रामपंचायतीला मोफत दिली आहे. मुंबई, पुणे येथील चाकरमान्यांना १४ दिवस क्वारंटाईन करण्यासाठी तिचा वापर करण्यात येणार आहे. आज जिल्ह्यात सरकारी यंत्रणेजवळ ज्या इमारती आहेत त्या सध्या कमी पडत आहेत. आज समाजातील सर्वच व्यक्तींनी सरकारला सहकार्य करणे गरजेचे आहे.- डॉ. शेखर जैन, अध्यक्ष, दर्शन विद्या एज्युकेशन संस्था
निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूलचे अद्यक्ष डॉ. शेखर जैन यांनी निरवडे ग्रामपंचायत प्रशासनाला आपल्या स्कूलची इमारत मोफत देऊन निरवडे ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांना चांगले सहकार्य केले आहे. आम्ही इमारतीची मागणी केली असता त्यांनी लगेच सहकार्य करून खºया मानवधर्माचे पालन केले आहे.- प्रमोद गावडे, सरपंच, ग्रामपंचायत निरवडे