शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

CoronaVirus Lockdown :हे सरकार परप्रांतियांचे आहे का : वैभव खेडेकर यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 5:56 PM

युपी, बिहारमधील नागरिकांसाठी सरकार मोफत रेल्वे सोडते. मात्र, कोकणात येणाऱ्या जनतेकडून दामदुप्पट पैसे घेतले जातात. हा कोकणी जनतेवर अन्याय आहे. हे सरकार परप्रांतियांचे आहे का, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण संघटक तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला आहे.

ठळक मुद्देहे सरकार परप्रांतियांचे आहे कावैभव खेडेकर यांचा सवाल

खेड : युपी, बिहारमधील नागरिकांसाठी सरकार मोफत रेल्वे सोडते. मात्र, कोकणात येणाऱ्या जनतेकडून दामदुप्पट पैसे घेतले जातात. हा कोकणी जनतेवर अन्याय आहे. हे सरकार परप्रांतियांचे आहे का, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण संघटक तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला आहे.मुंबईतून कोकणात येणाऱ्या नागरिकांकडून तिकिटाचे जास्त पैसे घेत असल्याच्या प्रकारावरुन त्यांनी सरकारवर निशाणा साधला. ते पुढे म्हणाले की, लॉकडाऊन होऊन आता जवळजवळ दीड महिना होईल. या काळात आपण अनेक संघर्षाला तोंड देत इथपर्यंत आलो आहोत. आता यापुढील काळ अधिक जबाबदारीचे आहेत.

मुंबईकर बांधव आता हळूहळू आपल्या गावी येत आहेत. त्यांची योग्यती वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. मुंबईत राहणाऱ्या लोकांनी दीड महिन्यात खूप अडचणीत दिवस काढले आहेत. दीड महिन्यात कोणताही रोजगार नाही, हातातील पैसे संपले, घरातील धान्य संपल. काहीजण चालत आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.ते पुढे म्हणाले की, सरकार रोज नवनवीन नियम काढत आहे. पण त्याचू अंमलबजावणी होत नाही. सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. परिवहमंत्री अनिल परब यांनी जाहीर केल की. लोकांसाठी एस. टी. प्रवास मोफत होईल. तर त्यांच्या सचिवांनी रात्रीच हा निर्णय फिरवला आणि कोकणातील जनतेला प्रति सीटमागे २ हजार रुपये आर्थिक भुर्दंड पडणार आहे.

मला सरकारला विचारायच आहे की, हे परप्रांतियांचे सरकार आहे का? युपी, बिहारमधील जनतेसाठी मोफत रेल्वे सेवा दिलीत. खाण्यापिण्याची व्यवस्था केलीत जे आपले मतदारही नाहीत. माझा कोकणी माणूस आपल्या पारड्यात भरभरून मत टाकतो. मग त्याला २ हजार रुपयांचा भुर्दंड का, असा सवाल खेडेकर यांनी केला आहे.त्याचबरोबर इथ आल्यानंतरही त्यांना त्रास सहन करावा लागतो. इथ आल्यानंतर तासनतास त्यांना स्वॅबसाठी रांगेत उभ राहावा लागत. काहींना सोडल जात, काहींना तिथेच ठेवल जात. सरकार आणि अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. सरकारच अधिकारी ऐकत नाहीत हे अधिकारी सुप्रीम पॉवर असल्यासारखे वागत आहेत.

कोरोनाचा सामना करत असताना अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय असणे गरजेचे आहे. सरकारचा अजिबात वचक नसल्याचा आरोपही त्यांनी केला. मुंबईतून येणाऱ्या प्रत्येकाला मोफत एस. टी. सेवा पुरवावी. अन्यथा भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला भुर्दंड सोसावा लागेल, असा इशाराही वैभव खेडेकर यांनी दिला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारण