शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
2
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
3
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
4
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
5
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
6
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
7
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
8
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
9
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
10
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
11
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
13
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
14
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
15
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
16
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
17
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
18
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
19
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त

CoronaVirus News: सिंधुदुर्गात 95 सक्रिय रुग्ण; आतापर्यंत 32 जणांची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 5:21 PM

कट्टा, मालवण येथील 1, मळेवाड, सावंतवाडी येथील एक आणि ओवळीये सावंतवाडी येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. 

कणकवली- जिल्ह्यात सद्या 95 सक्रिय रुग्ण आहेत. एकूण 130 बाधित रुग्णांपैकी 32 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 1 रुग्ण उपचारांसाठी मुंबई येथे गेला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयास काल  8 जून 2020 रोजी रात्री उशिरा प्राप्त अहवालामध्ये 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये कट्टा, मालवण येथील 1, मळेवाड, सावंतवाडी येथील एक आणि ओवळीये सावंतवाडी येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या कणकवली तालुक्यातील पुढीलप्रमाणे कंटेन्मेंट झोन आहेत. मौजे धालवली मधील धनगरवाडी, मौजे घोणसरी येथील पिंपळवाडी, मौजे हळवल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हळवल नं. 1, मौजे कलमठ येथील जि.प. प्राथमिक शाळा कलमठ कुंभारवाडी, मौजे तळेरे, मौजे नाटळ, मौजे कुरंगवणे, मौजे नवीन कुर्ली वसाहत, मौजे जानवली गावातील घरटणवाडी येथील प्राथमिक शाळा, मौजे शेर्पे येथील बौद्धवाडी, शिवडाव, डामरे, मौजे वारगाव येथील धुमकवाडी, मौजे हरकुळ बुद्रुक येथील कांबळेवाडी, आईनतळवाडी, व्हावटवाडी, मौजे बीडवाडी येथील बीडवाडी हायस्कुल व आवार, मौजे कासार्डे येथील धुमाळवाडी, मौजे हरकुळ खुर्द येथील गावठण, तांबळवाडी, वरचीवाडी, गायकवाडवाडी, मौजे बावशी येथील शेळीचीवाडी, मौजे पियाळी येथील गावठण. वैभववाडी तालुक्यात मौजे भूईूबावडा गावातील बौद्धवाडी, पहिलीवाडी, तळीवाडी, मौजे वेंगसर गावातील बंदरकरवाडी, मौजे तिरवडे तर्फ सौंदळ गावातील घागरेवाडी, मौजे कोळपे व मेहबुबनगर, ब्राह्मणदेववाडी, उंबर्डे आणि मौजे कोकिसरे गावातील पालकरवाडी हे कंटेन्मेंट झोन आहेत.सावंतवाडी तालुक्यातील मौजे मळेवाड – माळकरवाडी येथील जि.प. शाळा नं. 2,  कारिवडे गावठणवाडी, मौजे माडखोल येथील बामणादेवीवाडी, मौजे निरवडे माळकरवाडी, मौजे बांदा गाव गवळीटेंबवाडी, मौजे असणिये येथील भट्टवाडी, धनगरवाडी, वायंणवाडी, चौकुळ अंतर्गत पाटीलवाडी, देऊळवाडी, जुवाटवाडी, खासकीलवाडी, तोरसवाडी, घोणसाटवाडी, मधलीवाडी,  मौजे सातोसे-दुर्गवाडी या ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत.  कुडाळ तालुक्यातील कंटेन्मेंट झोनची माहिती पुढील प्रमाणे आहे. मौजे उपवडे येथील दातारवाडी, पणदूर – मयेकरवाडी, आंब्रड गावची वरची परबवाडी, तांबेवाडी, टेंबवाडी, मौजे पडवे गावची पडवे पहिलीवाडी, मौजे गावराई गावची टेंबवाडी, मौजे रानबांबूळी गावची पालकरवाडी, मौजे हिर्लोक गाव खालची परबवाडी, मौजे साळगाव लुभाटवाडी  हे कंटेन्मेंट झोन आहेत.मालवण तालुक्यातील मौजे चिंदर येथील देऊळवाडी, गावडेवाडी, शाळा गावठाणवाडी, बागवाडी, गोसावी मठ,  हिवाळे, सुकळवाड येथील राऊळवाडी व ठाकरवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यातील मौजे आसोली – फणसखोलवाडी,  मातोंड हे कंटेन्मेंट झोन आहेत. देवगड तालुक्यातील मौजे किंजवडे येथील आदर्श विद्यालय,  मौजे शिरगाव मधील धोपटेवाडी, मौजे नाद मधील भोळेवाडी, मौजे नाडन येथील मिराशीवाडी येथे कंटेन्मेंट झोन आहेत. दोडामार्ग तालुक्यात मौजे कुंब्रल वराचा वाडा येथील जि.प.शाळा कुंब्रल नं. 1, मौजे कसई,, वनविभाग विश्रामगृह परिसर असे कंटेन्मेंट झोन आहेत.  जिल्ह्यातील सर्व धार्मिक कार्यक्रम व धार्मिक स्थळे बंदच राहणात आहेत. राज्य शासनाकडून पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतर याविषयी निर्णय घेण्यात येईल. 

अ.क्र    विषय    संख्या1    पाठविण्यात आलेले एकूण नमुने    26702    अहवाल प्राप्त झालेले नमुने    25953    आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेले नमुने    1304    निगेटीव्ह आलेले नमुने    24655    अहवाल प्राप्त न झालेले नमुने    756    सध्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण    957    डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण    328    मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या    29    विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण    11810    आज रोजी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती    541311    संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती    2177512    शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती    35713    गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती    1989114    नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती    152715    2 मे 2020 रोजी पासून जिल्ह्यात आलेल्यांची संख्या    83846

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस