ठळक मुद्देसिंधुदुर्गात १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यूजिल्ह्यात नव्याने आढळले ४३२ रुग्ण
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज आणखी १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तर नव्याने ४३२ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. दरम्यान आतापर्यंत १४ हजार १०१ रूग्ण बरे होऊन घरी परतले, तर ५ हजार ७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
- आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण -426 + ( 6 दुबार लॅब तपासणी ) एकूण 432
- सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण- 5,075
- सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण- 6
- आज अखेर बरे झालेले रुग्ण- 14,139
- आज अखेर मृत झालेले रुग्ण-477
- मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण-16
- आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण-19,697
तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण1) देवगड- 46, 2) दोडामार्ग- 28, 3) कणकवली- 74, 4) कुडाळ- 70, 5) मालवण- 70, 6) सावंतवाडी- 70, 7) वैभववाडी- 11, 8) वेंगुर्ला- 55, 9) जिल्ह्याबाहेरील- 2.