कुडाळ : सद्यःस्थितीत कोरोनो विषाणूचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन कुडाळ तालुक्यात ७ ते १५ मे या कालावधीत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय लोकप्रतिनीधी, व्यापारी संघटना प्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी, नगरपंचायत पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. कुडाळ तालुक्यातील सर्व नागरिकांनी याला उत्फूर्तपणे प्रतिसाद देऊन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार अमोल फाटक यांनी केले.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत तहसीलदार अमोल फाटक यांच्या उपस्थितीत उपाययोजना राबविण्याबाबत कुडाळ तहसील कार्यालय येथे बैठक झाली. यावेळी नगराध्यक्ष ओंकार तेली, सहायक गटविकास अधिकारी मोहन भोई, नगरपंचायत मुख्याधिकारी नितीन गाढवे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, कुडाळ तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट, नगरसेवक राकेश कांदे, सुनील बांदेकर, नगरसेविका संध्या तेरसे, अभय शिरसाट, बनी नाडकर्णी, राजन नाईक, गोविंद सावंत, प्रसाद धडाम, प्रणय तेली, मंदार शिरसाट, बंड्या सावंत, संदीप कोरगावकर, भास्कर परब तसेच व्यापारी संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.अभय शिरसाट यांनी केवळ कुडाळ शहर नाही, तर पूर्ण तालुक्यात जनता कर्फ्यू केला तरच हेतू साध्य होईल असे सांगितले. नुसतेबंड्या सावंत यांनी सांगितले की, जनता कर्फ्यू आवश्यक आहे. मात्र पोलिस प्रशासनाने चुकीच्या पध्दतीने कारवाई करू नये. बँका ही बंद ठेवाव्यात. यावेळी फाठक यांनी सांगितले की, जनता कर्फ्यू हा जनतेने जनतेसाठी पुकारलेला असल्याने त्यामध्ये शासनाचा कोणतीही हस्तक्षेप नसतो. त्यामुळे कोणावरही कारवाई केली जाणार नाही.विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई : पाठकया कालावधीत घोटगे, ओरोस, हळदीचे नेरुर, कडावल, पणदुर, कामळेवीर, कसाल, पिंगुळी, नेरुर, आंब्रेड, माणगांव या गावातील ग्रामनियंत्रण समितीचे सदस्य तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील हे विशेष देखरेख ठेवतील व नियमांचे उल्लंघन करणा-या तसेच विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असे फाटक यांनी सांगितले.
CoronaVIrus In Sindhudurg : कुडाळ तालुक्यात ७ मे पासून जनता कर्फ्यूचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 15:06 IST
CoronaVirus Sindhudurg : सद्यःस्थितीत कोरोनो विषाणूचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन कुडाळ तालुक्यात ७ ते १५ मे या कालावधीत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय लोकप्रतिनीधी, व्यापारी संघटना प्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी, नगरपंचायत पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. कुडाळ तालुक्यातील सर्व नागरिकांनी याला उत्फूर्तपणे प्रतिसाद देऊन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार अमोल फाटक यांनी केले.
CoronaVIrus In Sindhudurg : कुडाळ तालुक्यात ७ मे पासून जनता कर्फ्यूचा निर्णय
ठळक मुद्देकुडाळ तालुक्यात ७ मे पासून जनता कर्फ्यूचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत मंजुरी : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शेवटचा उपाय