सावंतवाडी : महाराष्ट्र सरकारने राज्यात 30 एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन जाहीर केले असले तरी सिंधुदुर्गमधील लाॅकडाऊन टप्याटप्याने शिथील केले जातील मात्र सीमाबंदी कायम राहाणार असल्याचे सिंधुदुर्गचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत संकेत दिले आहेत. ते आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले त्यानी शनिवारी सायंकाळी सावंतवाडीच्या बाजारपेठेची पाहणी केली. यावेळी पोलीस उपाधीक्षक शिवाजी मुळीक, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, शब्बीर मणियार, नगरसेवक बाबू कुडतरकर आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे, असे असले तरी सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लॉकडाऊन 14 नंतर टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याबाबत प्रशासनासोबत चर्चा करत आहोत ही चर्चा अंतिम टप्प्यात असून जसे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. तसेच लॉकडाऊन दोन टप्याटप्याने कसे शिथील करावे हे ठरवण्यात येणार आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्हा हा कोरोनामुक्त आहे.विद्यापीठ परीक्षाबाबत काही गैरसमज आहेत. मात्र कोणतीही आणीबाणी आली तरी विद्यापीठाच्या सर्व परीक्षा होणार आहे. याबाबत समिती नेमण्यात आली आहे. त्या समितीचा अहवाल ही लवकरच येईल त्यानंतर प्रत्यक्षात लाॅकडाऊन कधी उठेल त्यानंतर परीक्षा कधी घ्यायची याची तारीख ठरवण्यात येईल.
Coronavirus : सिंधुदुर्गचे लाॅकडाऊन शिथील होणार; मात्र सीमाबंदी कायम राहणार, पालकमंत्र्यांचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 8:31 PM