शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

महामार्गाच्या जमिनीचा मोबदला पाचपट

By admin | Published: January 27, 2016 11:51 PM

चौपदरीकरण भूमिपूजन : गडकरी, फडणवीस उद्या रत्नागिरीत

रत्नागिरी : चौपदरीकरणामुळे होणाऱ्या विस्थापितांना रेडीरेकनरच्या दरापेक्षा ५ पट जमिनीचा मोबदला दिला जाणार आहे. वारस तपास केल्यानंतर प्रशासनाकडून जून - जुलैमध्ये हा मोबदला दिला जाईल, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. चौपदरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन २९ रोजी केले जाणार असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासाठी उपस्थित राहणार आहेत.यावेळी सचिन वहाळकर, दत्तात्रय देसाई, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, शहराध्यक्ष प्रशांत डिंगणकर, पंचायत समितीचे उपसभापती योगेश पाटील, तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी व अन्य उपस्थित होते. माने पुढे म्हणाले, मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ९0 टक्के भूसंपादन झाले आहे़ या पार्श्वभूमीवर चौपदरीकरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात येणार आहे़ २९ जानेवारीला सकाळी १० वाजता निवळी येथे पेट्रोलपंपासमोर केंद्रीय भूपृष्ठ, रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते चौपदरीकणाचा कोनशिला समारंभ होणार आहे. ६ टप्प्यांच्या उर्वरित कामाच्या निविदा फेब्रुवारीमध्ये निघणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. भूसंपादनाबाबत माने म्हणाले, ही किचकट प्रक्रिया १८ ते २० महिने सुरू आहे. सेक्शन ३ (अ)नुसार हरकती दावे व नोंदवले असून ३ (ब)नुसार राजपत्रात नोंद करून सरकारकडे जमिनींचा ताबा मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. रायगड जिल्ह्यात काम प्रलंबित असल्याने ठेकेदारांना विश्वासात घेऊन काम सुरू झाले आहे. गेल्या दहा वर्षांत अपूर्ण राहिलेले काम आता पुढील दोन-तीन वर्षांत पूर्ण होईल, त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवळीमध्ये या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी १२ वाजता पुण्याकडे रवाना होणार आहेत. सकाळी ९.३० वाजता मार्गताम्हाने येथील कार्यक्रम आटोपून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी निवळी येथे पोहोचतील. त्यानंतर मंत्री गडकरी यांच्या उपस्थितीत रत्नागिरी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या नव्या जिंंदल इमारतीचे आणि रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयातील सावरकर संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. (शहर वार्ताहर)बाळ माने : महामार्ग होणार काँक्रीटचा...!२६ मे २०१४ रोजी केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर गडकरी यांना रस्ते वाहतूक मंत्रीपद मिळाले. त्यामुळे कोकणच्या विकासाच्या आशा पल्लवीत झाल्या. इंदापूर ते झाराप हा ३६६ किलोमीटर्सचा महामार्ग सिमेंट काँक्रिटचा करण्यास गडकरी यांनी मंजुरी देऊन ६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी सांगितले. चौपदरीकरणाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री अनंत गीते, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार विनायक राऊत यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थित राहणार आहेत.मंत्र्यांचीही मांदियाळी२९ ते ३१ जानेवारी या तीन दिवसांत पाच मंत्री रत्नागिरीत येणार आहेत़. ३० तारखेला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक सरकारी योजनांचा आढावा घेणार आहेत. २९ला सिंधुदुर्ग व ३० रोजी रत्नागिरीचा आढावा घेतील. ३१ला स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलनाच्या समारोपाला केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहणार आहेत.