कसई दोडामार्ग : देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण या देशातील मानसिक गुलामगिरी नष्ट झालेली नाही. जोपर्यंत मानसिक गुलामी नष्ट होत नाही, तोपर्यंत या देशातील लोक कधीही स्वातंत्र्य उपभोगणार नाहीत. या देशातील मानसिक गुलामी केवळ बौध्द धम्माच्या विचारातून नष्ट होऊ शकते. यासाठी देशाला बौध्द धम्माशिवाय तरणोपाय नाही, असे मत भन्तेजी प्रज्ञानंद यांनी व्यक्त केले.सिंधुदुर्ग बौध्द हितवर्धक महासंघ, मुंबई, दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ले व गोवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दोडामार्ग येथील महाराजा हॉलमध्ये ५९ वा ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी प्रज्ञानंद बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाध्यक्ष केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष व्ही. ए. कदम, माजी केंद्रीय कार्यकारिणी अध्यक्ष शंकर जाधव, सचिव विद्या व्ही. कदम, खजिनदार विठ्ठल वजराटकर, सल्लागार रामचंद्र नेमळेकर, सदस्य सुरेश जाधव, तुकाराम कदम, गोपाळ जाधव, सावंतवाडीचे अध्यक्ष शिवाजी जाधव, कुडाळचे अध्यक्ष प्रकाश मुणगेकर, वेंगुर्ले शाखेचे अध्यक्ष भिवा गवस, गोवा विभागाचे अध्यक्ष विजय विरनोडकर, कृष्णा जाधव, रमाकांत जाधव, पांडुरंग कदम, दिगंबर पावसकर, नारायण आरोंदेकर, मिलिंद वेंगुर्लेकर, सुदेश आगरवाडेकर आदी उपस्थित होते.भन्तेजी प्रज्ञानंद यांच्या हस्ते गौतम बुध्दांच्या प्रतिमेला व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी प्रज्ञानंद म्हणाले, डॉ. बाबासाहेबांनी म्हटले आहे की, कुठच्या धर्मात जन्म घेणे माझ्या हातात नव्हते. पण या धर्मात मी मरणार नाही, अशी मी शपथ घेतो. प्रतिज्ञा करतो. या धर्मामध्ये स्वातंत्र्य नाही, बंधुत्व नाही, न्याय नाही, समता नाही. इथे माणसाला साथ कधीही दिली जात नाही. बाबासाहेबांनी जगातील एकही धर्म सोडला नाही. सर्व धर्मांचा अभ्यास केला आणि शेवटी माणसाला माणूस म्हणून बोलण्याची बोलण्याची प्रज्ञा असलेल्या बौध्द धम्माचा स्वीकार केल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण दिवसभरातील कार्यक्रमातील दुसऱ्या सत्रामध्ये परिसंवाद आयोजित केला. यावेळी बौध्द धम्म धार्मिक चळवळीत तन, मन, धन अर्पूण काम करत धम्म चळवळ पुढे नेणाऱ्या धम्म बांधवांचा यावेळी सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन शाखेच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी विचामंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या. (वार्ताहर)
देशाला बौद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानाची गरज
By admin | Published: November 16, 2015 11:00 PM