सावंतवाडी : नरेंद्र डोंगर परिसरात पुन्हा एकदा महाकाय गव्यांच्या कळपाने आपली हजेरी लावली आहे. त्या ठिकाणी फिरण्यासाठी गेलेल्यांना आठ गवे समोर दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. पूर्वी एखादा गवा दिसत होता. मात्र, आता गवे हे कळपाने खाली यायला लागल्याने सकाळी व सायंकाळच्या वेळी फिरायला जाणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. यावर वेळीच उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.गवे कळपाने येत असल्याची माहिती नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी दिली. तसेच गवे बिनदिक्कत सायंकाळच्या वेळेत फिरत आहेत. त्यामुळे लोकांनी सुरक्षेचा भाग म्हणून डोंगरावर फिरण्यासाठी जाऊ नये, असे आवाहन केले आहे.सावंतवाडी शहरातील नरेंद्र डोंगर परिसरात राहणारे बरेचसे ज्येष्ठ नागरिक सायंकाळी व सकाळच्या वेळी नरेंद्र डोंगरांवर पाय मोकळे करण्यासाठी जातात. रविवारी सायंकाळी त्याठिकाणी गेलेल्या काही लोकांना हा गव्यांचा कळप आढळून आला.दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी गवे थेट भरवस्तीत येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यांना जंगल परिसरात जाऊन ते गोंधळतील असे वागू नका, असे आवाहन वनविभागाने केले आहे. याबाबत वनविभागाचे अधिकारी गजानन पाणपट्टे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुजोरा दिला आहे.परिसरात गव्यांचा कळप आहे. तो अन्नासाठी फिरत आहे. त्यामुळे लोकांनी आपली सुरक्षितता लक्षात घेऊन जंगल परिसरात एकटे जाणे टाळावे, असे त्यांनी आवाहन केले आहे. तर नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी ही गवे बिनदिक्कत सायंकाळच्या वेळेत फिरत आहेत. त्यामुळे लोकांनी सुरक्षेचा भाग म्हणून डोंगरावर फिरण्यासाठी जाऊ नये, असे आवाहन केले आहे.गव्यांसाठी पाणवठे हवेगेल्या वर्षी नरेंद्र डोंगरावर सिमेंटचे जंगल उभारण्यात आले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गवे शहरात आले होते. तसेच रात्रीच्या वेळी गवे नरेंद्र डोंगरातून उतरून महामार्गावरून नेमळेच्या जंगलात जात असताना अपघातही झाला होता. त्यामुळे या गव्यांना नरेंद्र डोगरावरच ठेवणे सध्यातरी योग्य असून, त्यांच्यासाठी पाणवठे तयार केले नाही तर हे सर्व गवे खाली येणार आहेत. त्यामुळे वनविभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
गवे कळपाने रस्त्यावर, भीतीचे वातावरण, फिरायला जाणाऱ्यांनी दक्षता घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 5:00 PM
नरेंद्र डोंगर परिसरात पुन्हा एकदा महाकाय गव्यांच्या कळपाने आपली हजेरी लावली आहे. त्या ठिकाणी फिरण्यासाठी गेलेल्यांना आठ गवे समोर दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. पूर्वी एखादा गवा दिसत होता. मात्र, आता गवे हे कळपाने खाली यायला लागल्याने सकाळी व सायंकाळच्या वेळी फिरायला जाणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. यावर वेळीच उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.
ठळक मुद्देगवे कळपाने रस्त्यावर, भीतीचे वातावरण नरेंद्र डोंगरावर फिरायला जाणाऱ्यांनी दक्षता घ्यावी