शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पेंडूरच्या कामाचे प्रस्ताव तयार करा

By admin | Published: March 27, 2015 10:18 PM

विनायक राऊत : जलसंधारण, पाटबंधारे अधिकाऱ्यांशी चर्चा

चौके : मालवण तालुक्यातील पेंडूर गावासाठी पाण्याचा महत्त्वाचा स्त्रोत असलेल्या पेंडूर तलावाची तसेच ग्रामस्थांची अनेक वर्षे मागणी होत असलेल्या तलावाच्या बंधाऱ्याच्या दुरूस्तीसंदर्भात खासदार विनायक राऊत यांनी बुधवारी दुपारी जलसंधारण विभाग, लघुपाटबंधारे विभाग या खात्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत पेंडूर ग्रामस्थांशी चर्चा करून तलावाची पाहणी केली. ग्रामस्थांच्या सूचनांनुसार लवकरात लवकर पेंडूर तलावाच्या बंधाऱ्याचे काम करण्यासाठीचे प्रस्ताव बनविण्याचे आदेश दिले.यावेळी सर्वप्रथम पेंडूरचे माजी सरपंच बाबा राणे यांच्या हस्ते राऊत यांचे तिळंबादेवी मंदिरात स्वागत करण्यात आले. त्यानंतर पेंडूर तलाव आणि बंधाऱ्याची पाहणी करण्यात आली. यावेळी पेंडूर सरपंच सुभान सावंत, नंदू नातू, मालवण तालुकाप्रमुख बबन शिंदे, पेंडूर शाखाप्रमुख रामू सावंत, ग्रामसेवक ए. जे. जाधव, किरण आकेरकर, अनिल ढोलम, डॉ. सावंत, देवगड जिल्हा परिषद उपविभाग शाखा कार्यालय मालवणचे उपअभियंता व्ही. जी. वाळके, ओरोस लघुपाटबंधारे विभाग शाखा अभियंता अ. ना. हिर्लेकर, आंबडपाल लघुसिंचन जलसंधारण उपविभाग सहायक अभियंता सर्जेराव पाटील, लांजा उपविभागाचे उपअभियंता एस. ए. लोले, शाखा अभियंता व्ही. जी. रजपूत, मालवण जिल्हा परिषद लघुपाटबंधारेचे उपअभियंता आर. व्ही. बागडे, शाखा अभियंता एच. एस. पाडगावकर, आदी अधिकारी आणि पेंडूर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी चर्चेदरम्यान ग्रामस्थांनी पेंडूर तलाव आणि बंधाऱ्यासंदर्भात काही सूचना केल्या. त्यामध्ये तलावाच्या बंधाऱ्यातून होत असलेली पाण्याची गळती थांबविणे, बंधाऱ्याच्या कडेने सेफ्टी गार्ड बसविणे, तलावाचे गेट उघडण्यासाठी चेनपुली बसविणे, रबरसेट बसविणे, सांडव्याची साफसफाई करणे, गेटची उंची वाढविणे, या मुख्य बंधाऱ्यास पूरक अशा ‘कुसबाना’ बंधाऱ्याचे नूतनीकरण करणे, तलावाच्या मुख्य बंधाऱ्याला सध्या १३ गाळे असून, त्यांची संख्या कमी करून सहा गाळे बनविणे या मागण्या ग्रामस्थांनी खासदार राऊत आणि अधिकाऱ्यांसमोर ठेवल्या. यावर राऊत यांनी ग्रामस्थांच्या या सर्व सूचना विचारात घेऊन बंधाऱ्याच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव बनविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. प्रमुख मागण्यातलावाच्या बंधाऱ्यातून होत असलेली पाण्याची गळती थांबविणे, बंधाऱ्याच्या कडेने सेफ्टी गार्ड बसविणे, तलावाचे गेट उघडण्यासाठी चेनपुली बसविणे, रबरसेट बसविणे, सांडव्याची साफसफाई करणे, गेटची उंची वाढविणे, मुख्य बंधाऱ्यास पूरक अशा ‘कुसबाना’ बंधाऱ्याचे नूतनीकरण करणे, तलावाच्या मुख्य बंधाऱ्याच्या गाळ्यांची संख्या कमी करून सहा गाळे बनविणे.