शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

कर्नाटकातील ट्रॉलर्स पकडला

By admin | Published: October 16, 2015 11:15 PM

स्थानिक मच्छिमारांचे लाखोंचे नुकसान

देवगड : देवगड समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या व स्थानिक मच्छिमारांच्या जाळ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान करणाऱ्या कर्नाटक मलपी येथील न्यू अरेबियन या पर्ससिन ट्रॉलर्सला शुक्रवारी पकडण्यात यश आले. या ट्रॉलर्ससह सात खलाशांना बंदर व मत्स्य विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले असून, सायंकाळी त्या ट्रॉलर्सवरील मासळीचा लिलाव करून त्याच्या पाचपट रकमेचा दंड त्यांना ठोठावण्यात येणार आहे. दंड भरल्यानंतरच या ट्रॉलर्सची मुक्तता करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.देवगड समुद्रामध्ये आठ वावाच्या आत मलपी कर्नाटक येथील पर्सनेट मच्छिमार नौकांनी घुसखोरी करून मच्छिमारी करीत असल्याचे स्थानिक मच्छिमारांना शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास आढळून आले. स्थानिक मच्छिमारांनी संबंधित खात्याकडे संपर्क साधून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच या पर्सनेट नौकांनी स्थानिक मच्छिमार नौकांच्या जाळ्याचे नुकसान केले होते. या घटनेनंतर तत्काळ मच्छिमार व्यावसायिक एकवटले व त्यांनी या घटनेसंदर्भात रितसर पंचनामे करण्यात यावे, सात खलाशी ताब्यातस्थानिक मच्छिमारांनी आपली नुकसान झालेली जाळी देवगड बंदर जेटीमध्ये ठेवून पोलिसांना पंचनामे करण्यास सांगितले व मलपी येथील घुसखोर बोटींचा पाठलाग करून त्यांना पकडण्याची मच्छिमारांनी मागणी केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन देवगड पोलिसांनी स्थानिक मच्छिमारी नौकांच्या फाटलेल्या जाळ्यांचे पंचनामे केले. स्पीड बोटीच्या सहाय्याने पाठलाग करून न्यू अरेबियन या बोटीवर ताबा मिळवून सात खलाशांना ताब्यात घेतले. अशी मागणी मत्स्यव्यवसाय खात्याकडे केली. २0 लाखांचे नुकसानत्यांच्याकडील मच्छीचा लिलाव करून लिलावाच्या पाच पट दंड ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई देवगड पोलीस, देवगड फिशरमेन विभाग, कस्टम विभाग यांनी स्थानिक मच्छिमारांच्या सहकार्याने केली आहे. सुमारे ३५ हून अधिक मच्छिमारी व्यावसायिकांचे १५० जाळ्यांचे एकूण २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनामे करण्यात आले आहेत. दिक्षिता दिलीप धुरी यांच्या नौकेवरील १० जाळ््यांचे नुकसान, योगेश धुरी यांच्या देवयानी नौकेवरील २ जाळ््यांचे नुकसान, अश्विनी धुरी यांच्या राजलक्ष्मी नौकेवरील ४ जाळ््यांचे नुकसान, अनुष्का धुरी यांच्या लक्ष्मा नौकेवरील दोन जाळ्यांचे नुकसान, सुशांत प्रभू यांच्या आई भवानी नौकेवरील २६ जाळ््यांचे नुकसान, भाग्यश्री बापर्डेकर यांच्या भद्रकाली नौकेवरील ३ जाळ््यांचे नुकसान, मिलींद बोरकरांच्या लतिका नौकेवरील ६ जाळ््यांचे नुकसान, धनश्री बोरकरांच्या मधुगिरी नौकेवरील ४ जाळ्यांचे नुकसान, पल्लवी कांदळगावकर यांच्या पांडुरंग कृपा नौकेवरील ५ जाळ््यांचे नुकसान, अरुण फणसेकरांच्या स्वामीराया नौकेवरील ४ जाळ््यांचे नुकसान, धनंजय कोयंडे यांच्या ओम गणेश नौकेवरील ५ जाळ््यांचे नुकसान, संजय रूमडे यांच्या श्रीराम नौकेवरील २ जाळ््यांचे नुकसान तसेच अविनाश चोपडेकर, महेंद्र चौगुले, प्रशांत कोयंडे, प्रफुल्ल गोळवणकर, माया गोलतकर, लक्ष्मण गोलतकर, प्रतिभा गोलतकर, पांडुरंग हिरनाईक, शितल बापर्डेकर, अभय पवार, तेजल चोपडकर, उमेश राणे, आंबेरकर, उत्कर्षा लोणे, उमेश लोणे, प्रभाकर पेडणेकर, प्रमोद पेडणे अशा मच्छिमारांच्या नौकेवरील जाळ््यांचे नुकसान झाले. (प्रतिनिधी)