ठळक मुद्दे वेंगुर्लेतील नारायण तलाव भ्रष्टाचार प्रकरणाची सुनावणी
वेंगुर्ले : येथील नारायण तलाव भ्रष्टाचाराच्या सुनावणीवेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व वेंगुर्ले नगरपरिषदेच्या कारभारावर उपलोकायुक्त शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात आर्थिक घोटाळ््यावर कारवाई न करणाºया शासकीय अधिकाºयांवर गुन्हे दाखल करावे लागतील, असे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी पुढील सुनावणी १४ जून २०१९ रोजी ठेवली असून, प्रतिवादींनी सुनावणीत समोर आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे सादर करावीत, अशी सूचना केली आहे.वेंगुर्ले येथील नारायण तलाव भ्रष्टाचाराची सुनावणी मंगळवारी सकाळी उपलोकायुक्त शर्मा यांच्या दालनात पार पडली. तक्रारदार अतुल हुले सुनावणीला उपस्थित होते. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्यातर्फे आनंद हुले यांनी बाजू मांडली, तर प्रतिवादी म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंता मनीषा पालांडे, कार्यकारी अभियंता रमेश मठकर तसेच वेंगुर्ले नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव साबळे सुनावणीला उपस्थित होते.नारायण तलाव दुरुस्तीतील घोटाळा कसा दडपला गेला याबाबत तक्रारदारांनी बाजू मांडल्यावर उपलोकायुक्त शर्मा यांनी महाराष्ट्र शासनाच्या भ्रष्टाचाराला पाठिंबा देणाºया प्रवृत्तीवर कडक ताशेरे ओढत सर्व गैरअधिकाºयांना चांगलेच फैलावर घेतले.निकृष्ट काम करणाºया कंत्राटदारावर शासनाने गुन्हा दाखल का केला नाही? संबंधित गैरअधिकाºयांची खातेनिहाय चौकशी पूर्ण का झाली नाही? महाराष्ट्र शासनाचे नुकसान झाले, ते कंत्राटदाराकडून का वसूल करण्यात येत नाही? निकृष्ट काम करणाºया कंत्राटदाराला काळ््या यादीत का टाकले नाही? काम असमाधानकारक असताना वाढीव रकमेची बिले कशी मंजूर करण्यात आली? अशी प्रश्नांची सरबत्ती केली.काय आहे नारायण तलाव भ्रष्टाचार प्रकरण?वेंगुर्ले शहरातील बारमाही पाण्याचे स्रोत असलेला ब्रिटिशकालीन नैसर्गिक तलाव. शेजारील सूर्य मंदिरामुळे या तलावास नारायण तलाव नाव पडले. बांधकामात दगड व चुन्याचा वापर असलेला हा तलाव ब्रिटिशकालीन वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. याठिकाणी जलशुद्धीकरण व वितरण व्यवस्था होती.२००० सालापर्यंत संपूर्ण वेंगुर्ले शहरात गुरुत्वाकर्षणाने बारमाही पाणीपुरवठा होत होता. या तलावाची देखभाल होत नसल्याने तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता व त्यामुळे वेंगुर्लेच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत गेला. २००४ मध्ये या तलावातील गाळ काढणे व दुरुस्तीचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे हाती घेण्यात आले.बांधकाम करताना योग्य पद्धतीने काम होत नसल्याने तलावाच्या भिंतीची मोडतोड करण्यात आली व ब्रिटिशकालीन तांब्याच्या वॉल्वची चोरी केली. त्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार अतुल हुले यांनी संबंधित यंत्रणेकडे वारंवार केली होती. मात्र, या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्याचे काम संबंधित यंत्रणेने केले.‘त्या’ अधिकाºयांवर गुन्हे दाखल होतील- : उपलोकायुक्तांची नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 8:07 PM