शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या जीवावर स्वतःची घरं भरली अन् पक्ष संकटात असताना भाजपात गेले"
2
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
4
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
5
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
6
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
7
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
9
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
10
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
11
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
12
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
13
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
14
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
15
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
16
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
17
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
18
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
19
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
20
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला

आंगणेवाडी यात्रोत्सवात भाविकांची मांदियाळी, राजकीय नेत्यांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 12:55 PM

मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या वाषिकोत्सवास सोमवारी पहाटे शानदार प्रारंभ झाला. देवीच्या दर्शनाची आस लागून राहिलेल्या भाविकांनी बोचऱ्या थंडीची तमा न बाळगता देवीचे भल्या पहाटे विविध दहा रांगातून दर्शन घेतले. आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ व प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे भाविकांना देवीचे दर्शन कमी कालावधीत घेता आले. सकाळच्या सत्रात भाविकांच्या गर्दीचा ओघ कमी वाटत असला तरी सायंकाळनंतर गर्दी वाढत गेली. त्यामुळे आंगणेवाडी गाव लाखो भाविकांच्या साक्षीने भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला.

ठळक मुद्देआंगणेवाडी यात्रोत्सवात भाविकांची मांदियाळी, राजकीय नेत्यांची गर्दी देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा पहाटेपासून ओघ सुरू

सिद्धेश आचरेकरमालवण : तालुक्यातील आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या वाषिकोत्सवास सोमवारी पहाटे शानदार प्रारंभ झाला. देवीच्या दर्शनाची आस लागून राहिलेल्या भाविकांनी बोचऱ्या थंडीची तमा न बाळगता देवीचे भल्या पहाटे विविध दहा रांगातून दर्शन घेतले. आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ व प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे भाविकांना देवीचे दर्शन कमी कालावधीत घेता आले. सकाळच्या सत्रात भाविकांच्या गर्दीचा ओघ कमी वाटत असला तरी सायंकाळनंतर गर्दी वाढत गेली. त्यामुळे आंगणेवाडी गाव लाखो भाविकांच्या साक्षीने भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला.दरम्यान, दीड दिवस चालणाऱ्या भराडी देवीच्या वाषिकोत्सवाची सांगता मंगळवारी मोड यात्रेने होणार आहे. दुसऱ्या दिवशीही हजारो भाविक देवीचरणी नतमस्तक होतात. त्यामुळे दोन दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवात व्यापाऱ्यांनी थाटलेल्या दुकानांतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. एस. टी. महामंडळाने मसुरे, मालवण, कणकवली या तिन्ही स्थानकांवरुन प्रवाशांना सुरळीत सेवा पुरविली. तसेच गावागावातून खास यात्रा स्पेशल गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते.आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ, आणि जिल्हा प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे भाविकांना देवीचे दर्शन सुलभतेने झाले.

मालवण तालुक्यातील मसुरे-आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी गर्दी केली होती. त्यामुळे मंदिर परिसर गजबजून गेला होता.सकाळच्या सत्रात अनेक राजकीय, शैक्षणिक तसेच चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांची भराडी देवीच्या दशर्नासाठी आंगणेवाडीत मांदियाळी फुलली. यात्रा भाविकांच्या गर्र्दीने गजबजून गेली होती.

केंद्रीय वाणिज्य व हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू, उमा प्रभू, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे, नीलम राणे, आमदार कालिदास कोळंबकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार आशिष शेलार, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार विनायक राऊत, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, खासदार राजन विचारे, आमदार वैभव नाईक, माजी महापौर दत्ता दळवी, मनसे नेते बाळा नांदगावकर तसेच अनेक स्थानिक राजकीय नेत्यांनी देवीचे दर्शन घेतले.

भाविकांनी घेतले शिस्तबद्ध दर्शनदेवीची स्वयंभू पाषाणमूर्र्ती अलंकारांनी सजविण्यात आली होती. पाषाणाला मुखवटा घालून साडी-चोळी नेसवली तसेच भरजरी वस्त्रे, अलंकार, दागिने घालून देवीला सजविण्यात आले. देवीच्या दर्शनासाठी भाविक रांगेत उभे राहून शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेत होते. भाविकांच्या आदरतिथ्यासाठी आंगणे कुटुंबीय सज्ज होते. 

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेsindhudurgसिंधुदुर्ग